दिंडोरीत किरकोळ कारणावरून मित्रांनी केला मित्राचा खून, तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 15:20 IST2018-01-05T15:19:37+5:302018-01-05T15:20:02+5:30

दिंडोरी : मोबाईल चोरल्याच्या आरोपावरून कट रचून दिंडोरी तालुक्यातील तुंगलदरा येथील तीन मित्रांनी एका मित्रास धारदार शस्त्राने गळ्यावर वार करत जीवे ठार मारल्याचा प्रकार उघडकीस आला असून दिंडोरी पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे. सचिन बगर असे मृताचे नाव आहे.

Mitra's murder on the Dindori minor grounds, and the three arrested | दिंडोरीत किरकोळ कारणावरून मित्रांनी केला मित्राचा खून, तिघांना अटक

दिंडोरीत किरकोळ कारणावरून मित्रांनी केला मित्राचा खून, तिघांना अटक

दिंडोरी : मोबाईल चोरल्याच्या आरोपावरून कट रचून दिंडोरी तालुक्यातील तुंगलदरा येथील तीन मित्रांनी एका मित्रास धारदार शस्त्राने गळ्यावर वार करत जीवे ठार मारल्याचा प्रकार उघडकीस आला असून दिंडोरी पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे. सचिन बगर असे मृताचे नाव आहे.
याबाबत दिंडोरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिंडोरी तालुक्यातील तुंगलदरा येथील सचिन राजाराम बगर (२२) यास त्याचा मित्र पोपट जगन बेंडकुळे याने घरातून
गुरु वारी रात्री आठ वाजता बाहेर घेऊन गेला. त्यांचे सोबत दीपक बाळू बेडकुळे, योगेश भास्कर बेडकुळे हे ही सोबत होते. पोपटचा मोबाईल सचिनने चोरल्याचा संशय होता. यावरून सचिनला तिघे तुंगलदरा गवळवाडी रस्त्यावर गवळवाडी शिवारात गवताच्या शेतात घेऊन गेले. तेथे त्यांचेत वाद होऊन सचिनला धारदार शश्राने गळ्याव वार करत गंभीर जखमी केले त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात बांधून मोटारसायकलवर मोहाडी साकोरे रस्त्यावरील कुर्णोली शिवारात रस्त्याच्या कडेला फेकून दिले. दरम्यान रात्री पोपट बेडकुळे याने हा घरी प्रकार सांगितल्यावर पहाटे पोलिसांना खबर मिळाली पोलिसांनी तातडीने सर्व आरोपींना ताब्यात घेत मृतदेह शोधून काढत पंचनामा केला.पोलीस उपअधीक्षक देविदास पाटील,पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांनी घटनास्थळी भेट देत तपासाबाबत सूचना दिल्या. दिंडोरी पोलिसांनी तिघा आरोपींविरु द्ध भादवी गुन्हा दाखल करत अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाडवी करत आहे. सचिन बगरच्या पश्चात आई, वडील,भाऊ असा परिवार आहे.

Web Title: Mitra's murder on the Dindori minor grounds, and the three arrested

टॅग्स :Nashikनाशिक