शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

अविश्वास ठरावाद्वारे भाजपाकडून दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 1:20 AM

केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे सत्ताधारी भाजप एक दिवसात अधिकाऱ्यांची उचलबांगडी करू शकतात. असे असताना नाशिक महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यावर भाजपकडून आणलेला अविश्वास ठराव म्हणजे निव्वळ जनतेची दिशाभूल असल्याची प्रतिक्रिया नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

नाशिक : केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे सत्ताधारी भाजप एक दिवसात अधिकाऱ्यांची उचलबांगडी करू शकतात. असे असताना नाशिक महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यावर भाजपकडून आणलेला अविश्वास ठराव म्हणजे निव्वळ जनतेची दिशाभूल असल्याची प्रतिक्रिया नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.  सत्ताधारी भाजप तुकाराम मुंडे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करून नाशिककरांच्या डोळ्यात धूळफेक व दिशाभूल करीत आहे़ जनतेचा कळवळा असल्याचे दाखविण्यासाठी सत्ताधाºयांकडून आयुक्तांवर अविश्वास ठराव आणला जाईल आणि सरकारकडून तो पुढे विखंडित केला जाईल. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही स्क्रिप्ट असल्याने हा शुद्ध नाशिककरांच्या भावनांशी खेळ आहे. सरकारकडून अविश्वास ठरावांना केराची टोपली दाखविली जात असल्याचे यापूर्वीही तुकाराम मुंडे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त असताना जनतेने बघितले आहे. पनवेल मनपाचा सुद्धा अविश्वास ठराव शासनाने विखंडित केल्याचे यापूर्वी घडले आहे. केवळ अविश्वास ठरावाद्वारे जनतेची दिशाभूल करून एक राजकीय खेळी करण्याचा कुटील डाव भाजपकडून खेळला जात असून, जनआंदोलनद्वारे हा कुटील डाव हाणून पाडू, असे समीर भुजबळ यांनी म्हटले आहे़ सर्वसामान्य नाशिककरांना न परवडणारी करवाढ, सिडकोसह गावठाणातील घरांचा प्रश्न, अंगणवाड्या बंद करणे, त्याचबरोबर कर्मचाºयांची पिळवणूक या विषयांमध्ये आम्ही नाशिककरांबरोबर आहोत. नाशिकमधील सत्ताधारी, वजनदार आमदार आणि महापौर हे मुख्यमंत्र्यांकडे जाऊन एक दिवसात आयुक्तांची बदली करून आणू शकतात़ मग हे अविश्वासाचे नाटक का? महासभेत करवाढ फेटाळून लावली तरी आयुक्तांनी करवाढीची अंमलबजावणी करणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. असा आरोप भुजबळ यांनी केला.आंदोलन छेडूसर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी तीव्र स्वरूपात आंदोलन छेडून जनतेची ताकद लवकरच सत्ताधाºयांना दाखवून देऊ. राष्ट्रवादीचे आंदोलन इतके तीव्र असेल की एकाही अधिकाºयाला खुर्चीवर बसू देणार नाही, अशी प्रतिक्रिया समीर भुजबळ यांनी दिली आहे़

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSameer Bhujbalसमीर भुजबळtukaram mundheतुकाराम मुंढे