बेपत्ता वृध्दाचा सापडला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 13:26 IST2019-12-14T13:26:11+5:302019-12-14T13:26:22+5:30

सिन्नर : तालुक्यातील गोंदे येथून चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या वृद्धाचा दापूर येथील ओहळात मृतदेह सापडला.

 Missing old body found | बेपत्ता वृध्दाचा सापडला मृतदेह

बेपत्ता वृध्दाचा सापडला मृतदेह

सिन्नर : तालुक्यातील गोंदे येथून चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या वृद्धाचा दापूर येथील ओहळात मृतदेह सापडला. विठ्ठल नाना तांबे (वय ६५, रा. गोंदे) असे मृत वृद्धाचे नाव आहे. विठ्ठल तांबे सोमवारी (दि. ९) दापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध आणण्यासाठी जाते, असे सांगून घरातून बाहेर पडले. मात्र, ते घरी न परतल्याने त्यांची नातेवाइकांकडे चौकशी केली. कोठेही मिळून न आल्याने वावी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार देण्यात आली होती. त्यावरून बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. गुरूवारी (दि.१२) दुपारी दोनच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील ओहोळात मृतदेह तरंगला असल्याचे गुराख्याचे बघितले. हा मृतदेह गोंदे येथील बेपत्ता झालेले विठ्ठल तांबे यांचा असल्याचे समजताच गोंदे ग्रामस्थांनी दापूरला धाव घेतली. वावी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. हवालदार पी. के. अढांगळे तपास करीत आहेत.

Web Title:  Missing old body found

टॅग्स :Nashikनाशिक