विंचूर : चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दिलीप मोरे या तरु णाचा मृतदेह येवला तालुक्यातील लौकी येथे पालखेड डाव्या कालव्यात सापडला.याबाबत सविस्तर माहिती अशी, येथील पांडुरंगनगरातील रहिवासी दिलीप धरमसिंग मोरे (१९) हा तरु ण बुधवारी (दि.१८) सकाळी येवला येथे कॉलेजला जातो, असे सांगून घराबाहेर पडला. परंतु संध्याकाळपर्यंत तो घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांनी (दि. १९) लासलगाव पोलीस ठाण्यात दिलीप हरवल्याची तक्र ार दाखल केली. शनिवारी लौकी गावच्या शिवारात पालखेड डाव्या कालव्यामध्ये अज्ञात तरु णाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसल्याचे लौकी येथील पोलीसपाटील यांनी येवला पोलीस ठाण्यास कळविले. त्यानुसार तेथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. येवला पोलिसांनी लासलगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधून बेपत्ता तरु ण व मृत तरु ण एकच असल्याची खात्री करून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. सायंकाळी शोकाकुल वातावरणात दिलीप याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विंचूर येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह मिळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 01:30 IST