अल्पवयीन युवती अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 18:55 IST2018-12-25T18:53:53+5:302018-12-25T18:55:44+5:30
सटाणा : शहरातील मध्यवर्ती चावडी चौकाजवळील राम मंदिराच्या पाठीमागील मोकळ्या भूखंडावर एका नराधमाने पंधरा वर्षीय अल्पवयीन युवतीवर अत्याचार केल्याने ...

अल्पवयीन युवती अत्याचार
सटाणा : शहरातील मध्यवर्ती चावडी चौकाजवळील राम मंदिराच्या पाठीमागील मोकळ्या भूखंडावर एका नराधमाने पंधरा वर्षीय अल्पवयीन युवतीवर अत्याचार केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पिडीत अल्पवयीन युवतीच्या आईने मंगळवारी (दि.२५) पहाटे चार वाजता या घटनेची तक्र ार सटाणा पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी हर्षद शरद सूर्यवंशी ( रा.गांधी चौक) याला अटक केली आहे.
पिडीत युवतीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे कि, माझी मुलगी सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कुरकुरे घेण्यासाठी दुकानात गेली असता हर्षद शरद सूर्यवंशी युवकाने अंधाराचा फायदा घेवून तिला चाकूचा धाक दाखवत चापटीने मारहाण करत आरडाओरड केली तर मारून टाकेल असा दम देत चावडी चौकाजवळील राम मंदिराच्या पाठीमागील मोकळ्या भूखंडावर नेले. त्याच ठिकाणी तिचे तोंड दाबून अंगावरील कपडे फाडून टाकत बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिल्याचे पिडीतेच्या आईने म्हटले आहे. नराधम आरोपी भैया हा सटाणा ग्रामीण रु ग्णालयात शवविच्छेदन विभागाचा कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान या प्रकरणी सटाणा पोलिसांनी पोस्को कायद्यासह बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून मंगळवारी दुपारी अप्पर पोलीस अधीक्षक निलोत्पल, सटाणा पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी सोनाली कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गणेश बुवा यांनी घटनास्थळाला भेट दिली असून पुढील तपास सुरु केला आहे.