जेलरोड परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 01:06 IST2019-03-19T22:49:02+5:302019-03-20T01:06:50+5:30
जेलरोड येथील मॉडेल कॉलनीतील डान्स क्लासहून घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या युवकाविरुद्ध विनयभंग व पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित युवकाला पोलिसांनी अटक केली आहे.

जेलरोड परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग
नाशिकरोड : जेलरोड येथील मॉडेल कॉलनीतील डान्स क्लासहून घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या युवकाविरुद्ध विनयभंग व पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित युवकाला पोलिसांनी अटक केली आहे.
जेलरोड मॉडेल कॉलनी भागात राहणारी १२ वर्षांची अल्पवयीन शाळकरी मुलगी ही परिसरात एका डान्स क्लासला जाते. जेलरोड सावरकरनगर येथील संशयित दीपक किरवे याने रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास डान्स क्लासवरून जाणाºया सदर अल्पवयीन मुलीला दुचाकी अडवून तिचा हात पकडून अश्लील वर्तन केले. या मुलीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्याने तिला शिवीगाळ करून पोटात मारून ढकलून दिले. याबाबत कोणाला सांगितले, तक्रार केली तर तुझा बेत पाहीन, असा दम देऊन निघून गेला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात संशयित दीपक किरवे यांच्याविरुद्ध विनयभंग व पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.