अल्पवयीन मुलगी विनयभंग प्रकरणी सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 16:07 IST2018-09-28T16:05:20+5:302018-09-28T16:07:16+5:30
नाशिक : शिकवणीहून परतत असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्या कुटुंबियाना जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी सुरेश विश्राम अहिरे (२५, रा़ शिवाजीनगर, कार्बन नाक्यामागे, सातपूर) यास प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी शुक्रवारी (दि़२८) तीन वर्षे सक्तमजुरी व एक हजार पाचशे रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली़ सरकारी वकील शिरीष कडवे यांनी या खटल्यात चार साक्षीदार तपासले़

सातपूर शिवाजीनगरमधील एका खासगी शिकवणीवरून २२ मार्च २०१८ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या घरी परतत असलेल्या अल्पवयीन मुलीच्या पाठिमागून पळत येऊन आरोपी सुरेश अहिरे याने हात धरला़ या मुलीने त्याचा प्रतिकार केला असता या मुलीला शिवीगाळ करून तिचे वडील व भावास जीवे मारण्याची धमकी दिली होती़ तसेच महाविद्यालयात जाण्याच्या व परतीच्या मार्गावरील रस्त्यावर अहिरे हा पाठलाग करीत होता़ तसेच घराच्या गच्चीतून या मुलीकडे एकटक बघत असले़ यापुर्वी ३० जानेवारी २०१८ रोजी मद्य प्र्नाशन करून अहिरे याने मुलीच्या वडीलांना शिवीगाळ व मारहाणही केली होती़
या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात विनयभंग तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़ न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्याचा तपास सातपूरच्या महिला पोलीस उपनिरीक्षक सीक़े़देवरे, एस़एस़जाधव यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ सरकारी वकील शिरीष कडवे यांनी घेतलेल्या चार साक्षीदारांपैकी पिडीत मुलगी व तिचे वडील यांचा जबाब आरोपी अहिरेविरोधात गुन्हा सिद्ध होण्यास महत्वाचा ठरला़
पिडीत मुलीस सहा महिन्यात न्याय
सर्वोच्च न्यायालयाने महिला व अल्पवयीन मुलांवरील अत्याचारप्रकरणी दाखल पोस्कोच्या गुन्ह्यांमध्ये जलद सुनावणी घेऊन निर्णय देण्याचे आदेश दिले आहेत़ त्यानुसार सातपूरच्या या घटनेतील पिडीतेस अवघ्या सहा महिन्यात प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी निकाल दिला आहे़ सातपूर पोलीस ठाण्यातील महिला अधिकाऱ्यांनी केलेला तपास, न्यायालयात वेळेत दाखल केलेले दोषारोपपत्र व न्यायालयाने केलेली जलद सुनावणी यामुळे या घटनेतील पिडीतेस अवघ्या सहा महिन्यात न्याय मिळाला आहे़