शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! भुसे-महाजनांच्या संघर्षात 'या' मंत्र्याला लागणार पालकमंत्रिपदाची लॉट्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 09:55 IST

नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दावा केला आहे. 

Nashik Politics: पालकमंत्री नियुक्तीवरून सध्या महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांत जोरदार संघर्ष सुरू आहे. अंतर्गत नाराजीमुळे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यावा लागला. रायगडच्या पालकमंत्रिपदी आदिती तटकरे व नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, यावरून शिंदेसेनेत नाराजीचा सूर उमटू लागला. त्यामुळे शासनाने तातडीने दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री नियुक्तीस स्थगिती दिली. परंतु आता नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दावा केला आहे. 

नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी कृषीमंत्री व नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या माणिकराव कोकाटे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.  एकीकडे, नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी भाजपचे गिरीश महाजन आणि शिवसेनेचे दादा भुसे यांच्यात संघर्ष सुरू असताना ऐनवेळी कोकाटे आघाडी मारू शकतात. या पार्श्वभूमीवर आगामी काही दिवसांत नेमकी कोणाची पालकमंत्रिपदी नियुक्ती होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

नाशिकमधील राजकीय घडामोडी चर्चेत

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर अचानक नाट्यमयरीत्या छगन भुजबळ यांचे नाव मंत्रिमंडळातून वगळले गेले. अर्थात, त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची पालकमंत्रिपदासाठी इच्छा प्रबळ झाली. त्यांच्यात आणि दादा भुसे यांच्यात दावे प्रतिदावे सुरू असताना कोकाटे यांनी बाहेरील जिल्ह्यातील पालकमंत्री नको असेही म्हटले होते. मात्र, नाशिकला गिरीश महाजन यांनाच नियुक्त करून  ॲड. माणिकराव कोकाटे यांनाही पर जिल्ह्यात म्हणजे नंदूरबारचे पालकमंत्रिपद देण्यात आले होते. परंतु  राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेच्या नाराजीनंतर २४ तासांत नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली.  

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरून परतल्यावरच पालकमंत्रपिदाचा तिढा सुटणार आहे. तत्पूर्वी प्रजासत्ताक दिनी गिरीश महाजन यांच्याच हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकGirish Mahajanगिरीश महाजनManikrao Kokateमाणिकराव कोकाटेMahayutiमहायुती