पिंपळगाव बसवंत येथे अतिक्र मणधारकांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 18:03 IST2018-08-14T18:03:14+5:302018-08-14T18:03:59+5:30
पिंपळगाव बसवंत: येथील दत्तनगर,चिंचखेडरोड,भाऊनगर,हनुमान नगर, वाल्मीक नगर,आंबेडकर नगर येथील अतिक्र मीत घरे नियमित करावीत, याबाबत ग्रामसभेत ठराव करून तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी मोर्चाद्वारे केली.

पिंपळगाव बसवंत येथे अतिक्र मणधारकांचा मोर्चा
पिंपळगाव बसवंत: येथील दत्तनगर,चिंचखेडरोड,भाऊनगर,हनुमान नगर, वाल्मीक नगर,आंबेडकर नगर येथील अतिक्र मीत घरे नियमित करावीत, याबाबत ग्रामसभेत ठराव करून तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी मोर्चाद्वारे केली. याबाबतचे निवेदन त्यांनी ग्रामसेवक लिंगराज जंगम यांना दिले. यावेळी पंचायत समितीचे सभापती राजेश पाटील,केशव बनकर,गणेश बनकर,बाळासाहेब आंबेकर,बाळासाहेब बंदरे,सदाशिव सोळसे,नाना जाधव,सुजीत मोरे ,गंगादास बैरागी, शोभा उगले, हिराबाई जाधव, यमुना निरघुडे, मथुरा कोपरे, लीला वाळूज,उषा हिरे,वंदना शिरसाठ,विठाबाई पागे आदि उपस्थित होते.