नाशिक : एलइडी टीव्ही आणि एसीचे गुदाम फोडत अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांची चोरी केल्याची घटना गुरुवारी (दि.२३) उघडकीस आली आहे. तिगरानिया कॉर्नरच्या गोदावरी एमआयडीसीमधील मॅट्रिक्स डिस्ट्रिब्युटर्स हे गुदाम मध्यरात्रीच्या सुमारास तीन अनोळखी चोरट्यांनी फोडले. या गुदामातून पॅनेसॉनिक आणि टीसीएल कंपनीचे एलसीडी संच आणि एसी मिळून एकूण १७ लाख ४२ हजार ६७२ रुपये किमतीचे संच व रोख रक्कम चोरुन नेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विशेष म्हणजे ही चोरी दोन तास सुरू होती. चोरट्यांनी एक ट्रक शटरच्या समोर लावून शटरच्या कड्या तोडल्या आणि गुदामामध्ये प्रवेश केला. गुदामातीस अर्धेे युनिट चोरून झाल्यावर त्याठिकाणी सीसीटीव्ही सुरू असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी त्याच्यावर कपडा टाकून कनेक्शन तोडून टाकले आहे. तसेच गुदामच्या कॅबिनमधील रोख ३५ हजार रुपयांची रक्कमही चोरून नेली आहे. तसेच कॅबिनमधील सीसीटीव्हीच्या एनकोडरची तोडफोड करण्यात आली आहे. गुदाम व्यवस्थापक सकाळी शटर उघडण्यासाठी आले असता ही बाब लक्षात आली आहे. या चोरीत चोरट्यांनी तीन लाख ६१ हजार ६१८ रुपये किमतीचे ३२ इंच आकाराचे ३३ एलसीडी टीव्ही व इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच ५ लाख ६१ हजार ६१८ रुपये किमतीचे ४३ इंच आकाराचे ३४ एलसीडी टीव्ही, ४ लाख २१ हजार २२९ रुपयांचे ५० इंच आकाराचे १६ एलसीडी असा एकूण जवळपास १७ लाख ४२ हजार ६७२ रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह काही रोख रक्कमेचीही चोरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक ए.जी. मुगले अधिक तपास करीत आहेत.
इलेक्ट्रॉनिक्सचे गुदाम फोडून लाखोंचा ऐवज लुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 18:43 IST
नाशिक शहरात अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांची चोरी केल्याची घटना गुरुवारी (दि.२३) उघडकीस आली आहे. तिगरानिया कॉर्नरच्या गोदावरी एमआयडीसीमधील मॅट्रिक्स डिस्ट्रिब्युटर्स हे गुदाम मध्यरात्रीच्या सुमारास तीन अनोळखी चोरट्यांनी फोडले. या गुदामातून पॅनेसॉनिक आणि टीसीएल कंपनीचे एलसीडी संच आणि एसी मिळून एकूण १७ लाख ४२ हजार ६७२ रुपये किमतीचे संच व रोख रक्कम चोरुन नेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे
इलेक्ट्रॉनिक्सचे गुदाम फोडून लाखोंचा ऐवज लुटला
ठळक मुद्देभद्रकालीतील एलेक्ट्रॉनिक वस्तुंचे गोदाम फोडलेअज्ञात चोरट्यांनी लुटला लाखोंचा माल