शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 01:07 IST

नांदूर वैद्य : इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी येथे एका घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने घरातील सर्व वस्तू तसेच घराच्या कामासाठी ठेवलेली पाच लाखांची रोख रक्कम, चार तोळे सोने व संसारोपयोगी साहित्य आगीत जळून भस्मसात झाले.

ठळक मुद्देबलायदुरी : पाच लाखांच्या रोख रकमेसह ४ तोळे सोने जळून खाक

नांदूर वैद्य : इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी येथे एका घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने घरातील सर्व वस्तू तसेच घराच्या कामासाठी ठेवलेली पाच लाखांची रोख रक्कम, चार तोळे सोने व संसारोपयोगी साहित्य आगीत जळून भस्मसात झाले.सदर घटना रविवारी (दि.९) सकाळी नऊच्या सुमारास घडली. इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी येथील कैलास लुक्कड भगत व घरातील अन्य व्यक्ती बाहेर गेल्या असताना अचानक घराच्या वरच्या बाजून धूर येताना दिसला. ग्रामस्थांनी आरडाओरड करत पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु काही तासांतच आगीने रौद्ररूप धारण केले. सदर आग आटोक्यात येत नसल्याने इगतपुरी नगरपालिकेतील अग्निशामक दल तसेच महिंद्रा कंपनीतील अग्निशामक दल असे दोन पाण्याचे बंब पाचारण करण्यात आल्यानंतर काही तासांतच अग्निशामक दलाच्या मदतीने आग विझविण्यात आली. मात्र, तोपर्यंत घरातील सर्व साहित्य जळून खाक झालेले होते.आगीचे रूप इतके भयानक होते की, त्यामध्ये घराच्या कामासाठी नुकतीच आणलेली पाच लाखांची रोख रक्कम, चार तोळे सोने, तसेच रोजच्या वापरातील भांडी, गॅस, आदींसह सर्वच मौल्यवान वस्तू, कपडे, टीव्ही, फ्रीज आदी आगीत भस्मसात झाले.या भीषण आगीत घरातील वापरायचे सर्व मौल्यवान साहित्य तसेच इतर सर्वच वस्तू जळून खाक झाल्यामुळे संबंधित कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. सदर कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला असून तलाठी तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी करून पंचनामा केला आहे.घराच्या कामासाठी कर्ज काढून पाच लाख रुपये जमवले होते. पै पै जमा करून उभा केलेला संसार काही क्षणांत उद्ध्वस्त झाला आहे. या घटनेमुळे घराचे पूर्ण नुकसान झाले असून सोने, तसेच महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्यामुळे आमची खूप मोठी हानी झाली आहे.- कचराबाई भगत, घरमालक, बलायदुरी.

टॅग्स :AccidentअपघातFairजत्रा