मद्यसाठ्यासह लाखोंचा माल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 00:10 IST2018-10-18T23:26:01+5:302018-10-19T00:10:35+5:30

राज्य उत्पादन शुल्क विभागाने गांधी सप्ताहनिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई करून १३५ गुन्हे दाखल केले आहेत़ या कारवाईमध्ये हजारो लिटर रसायन नष्ट करण्यात आले असून, विदेशी मद्यसाठ्यासह दहा लाख ९३ हजार ५८३ रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे़

Millions of items seized with alcohol | मद्यसाठ्यासह लाखोंचा माल जप्त

मद्यसाठ्यासह लाखोंचा माल जप्त

ठळक मुद्देराज्य उत्पादन शुल्क विभाग : नऊ पथकांची निर्मिती; १३५ गुन्हे दाखल

नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाने गांधी सप्ताहनिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई करून १३५ गुन्हे दाखल केले आहेत़ या कारवाईमध्ये हजारो लिटर रसायन नष्ट करण्यात आले असून, विदेशी मद्यसाठ्यासह दहा लाख ९३ हजार ५८३ रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे़
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक सी. बी. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी सप्ताहात जिल्हातील विविध ठिकाणी असलेले अवैध दारूविक्री केंद्र, गावठी हातभट्टी विक्री, बेकायदा ताडी केंद्र व अवैधरीत्या मद्याची तस्करीविरोधात मोहीम राबविण्यात आली. १ ते ८ आॅक्टोबर या कालावधीत कारवाईसाठी नऊ पथकांची निर्मिती करण्यात आली होती, तर विशेष मोहिमेसाठी सात पथके तैनात करण्यात आली होती़ गांधी सप्ताहात या पथकांनी विविध ठिकाणी कारवाई करून १३५ गुन्हे दाखल करून १३५ संशयितांना अटक केली़
परवानगी नसलेले ३८२ लि. विदेशी मद्य, एक हजार १३४ लिटर हातभट्टीची दारू, १८० लि. ताडीही जप्त केली आहे. या पथकांनी सुमारे सहा लाखांचा मद्यसाठा व सात वाहने जप्त केली आहे.

Web Title: Millions of items seized with alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.