लवाटेनगरमध्ये दागिन्यांसह लाखोंची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:52 IST2018-06-05T00:52:17+5:302018-06-05T00:52:17+5:30

 Millions of crores of jewelery along with jewelery in Lavatangar | लवाटेनगरमध्ये दागिन्यांसह लाखोंची घरफोडी

लवाटेनगरमध्ये दागिन्यांसह लाखोंची घरफोडी

नाशिक : वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयांच्या फ्लॅटचा दरवाजा उघडून चोरट्यांनी सोळा तोळे सोन्याचे दागिने व चार लाख रुपयांची रोकड असा सुमारे सव्वासात लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सिटी सेंटर मॉलजवळील लवाटेनगरमध्ये शनिवारी (दि़२) रात्रीच्या सुमारास घडली़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ स्प्लेंडर रेसिडेन्सीत संदीप सुमतीलाल सुराणा हे कुटुंबीयांसह वाढदिवसासाठी गेले होते़ ही संधी साधून चोरट्यांनी घरात प्रवेश केला़ यानंतर कपाटात ठेवलेली एक लाख ४० हजार रुपयांची ७ तोळे वजनाची सोन्याची पोत, ६० हजार रुपयांचे नक्षीकाम असलेले तीन तोळे वजनाचे सोन्याचे कडे, ६० हजार रुपयांचे तीन तोळे वजनाचे सोन्याचे कडे, ५० हजार रुपयांच्या अडीच तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, चार हजार रुपयांची सोन्याची गिन्नी, पाच हजार रुपयांच्या चांदीच्या तोरड्या तसेच ३ लाख ९७ हजार रुपयांची रोकड असा सात लाख १६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़
सीसीटीव्ही बंद
गंगापूर पोलिसांनी घरफोड्यांचा शोध घेण्यासाठी स्प्लेंडर रेसिडेन्सीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता ते बंदस्थितीत असल्याचे समोर आले़ यानंतर परिसरातील एका हॉटेलसमोर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली, मात्र त्यामध्ये संशयितांचा माग मिळाला नाही़

Web Title:  Millions of crores of jewelery along with jewelery in Lavatangar