आमिष दाखवून लाखोंची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 12:07 AM2019-11-24T00:07:16+5:302019-11-24T00:07:45+5:30

आपण फॅशन शोचे आयोजन करीत असून, त्या माध्यमातून तुमच्या मुलीला एक्टिव्हा गाडीचे बक्षीस मिळवून देतो. त्यासाठी नोंजणीचे शुल्क, तसेच तुमच्या मुलीला चित्रपटातही काम करण्याची संधी देतो.

 Millions cheat by showing bait | आमिष दाखवून लाखोंची फसवणूक

आमिष दाखवून लाखोंची फसवणूक

Next

नाशिक : आपण फॅशन शोचे आयोजन करीत असून, त्या माध्यमातून तुमच्या मुलीला एक्टिव्हा गाडीचे बक्षीस मिळवून देतो. त्यासाठी नोंजणीचे शुल्क, तसेच तुमच्या मुलीला चित्रपटातही काम करण्याची संधी देतो. चित्रपटाचे शूटिंग दक्षिण आफ्रिकेत असून, तिच्यासोबत जाणाऱ्या व्यक्तींच्या प्रवासाचा खर्च व राहण्याचा खर्च म्हणून काही रक्कम द्यावी लागेल, असे आमिष दाखवून जळगाव येथील एका व्यक्तीची दोन लाख ७४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरानगर-राणेनगर परिसरातील एका सायबर कॅफेमध्ये जानेवारी-२०१७ ते मार्च-२०१९ या तीन वर्षांच्या कालावधीत कामठवाडा खुटवटनगर येथील संशयित हर्षद आनंदा सपकाळ याने जळगाव येथील उत्कर्ष सोसायटीत राहणारे अनिल भूजंगराव चिंचोले (५५) यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. संशयितांना चिचोले यांना तुमच्या मुलीला फॅशन शोमध्ये सहभाग घेण्यास सांगा. त्याठिकाणी एक्टिव्हा गाड्या बक्षीस असून, त्यातून तुमच्या मुलीला बक्षीस मिळवून देईल. तसेच कारही मिळवून देईल. त्याच्या रजिस्ट्रेशनसाठी लागणारी फी द्यावी लागेल. त्याचप्रमाणे तुमच्या मुलीला चित्रपटातही काम करण्याची संधी देतो. चित्रपटाची शूटिंग दक्षिण आफ्रिकेत असून, तिच्यासोबत जाणाºया व्यक्तींच्या प्रवासाचा खर्च व राहण्याचा खर्च म्हणून काही रक्कम द्यावी लागेल, असे आमिष दाखवून २ लाख ७४ हजार रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद अनिल चिंचोले यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्याच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक जगदाळे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
म्हसरूळमध्ये दोन दुचाकी जाळल्या
मखमलाबाद परिसरातील शांतीनगरच्या वेदांत रेसिडेन्सीत एका संशयिताने दोन दुचाकी जाळल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेदांत रेसिडेन्सीतील सुनील नामदेव जामुदे (२६) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांची दुचाकी क्रमांक एमएच १५ जीटी ३४०१ आणि योगेश अशोक चकोर यांची एमएच ४१ एसी ३७९९ या दोन दुचाकी पार्किंगमध्ये शेजारी पार्क केलेल्या असताना संशयित ज्ञानेश्वर मधुकर शिलवंत याने त्यांना आग लावून नुकसान केल्याचा संशय फिर्यादींनी व्यक्त केला असून, या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार पठाण अधिक तपास करीत आहेत.

Web Title:  Millions cheat by showing bait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.