गटविकास अधिकारी मिलिंद धांडेंचा मृत्यू

By Admin | Published: February 8, 2015 12:25 AM2015-02-08T00:25:38+5:302015-02-08T00:27:23+5:30

गटविकास अधिकारी मिलिंद धांडेंचा मृत्यू

Milk development officer Milind Dhande dies | गटविकास अधिकारी मिलिंद धांडेंचा मृत्यू

गटविकास अधिकारी मिलिंद धांडेंचा मृत्यू

googlenewsNext

नाशिक : सुरगाणा येथील गटविकास अधिकारी मिलिंद धांडे (वय ५५) यांचा गुरुवारी (दि.५) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. जिल्हा परिषदेत सन २००२ ते २००५ या काळात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) या पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांची धुळ्याला बदली झाली होती. गेल्या दोन वर्षांपासून ते सुरगाणा पंचायत समितीत गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. मात्र स्थानिक राजकीय पक्षांच्या वादामुळे तसेच प्रकृती अस्वाथ्यतेच्या कारणास्तव ते गेल्या काही महिन्यांपासून रजेवर होते. गुरुवारी रात्री आठ वाजता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यात त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगी, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Milk development officer Milind Dhande dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.