लासलगावी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 18:09 IST2018-08-05T18:09:30+5:302018-08-05T18:09:36+5:30
लासलगाव : येथील सुमतीनगर भागातील जय बाबाजी बंगल्याचे दरवाज्यासमोर पहाटे दरोडा टाकण्याचे तयारीत असलेल्या श्रीरामपुरच्या दरोडेखोरांच्या टोळीतील चौघांना साहीत्य व इंडिया कारसह अटक करण्यात आली. या टोळीकडून जिल्ह्यात झालेल्या मोठ्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.

लासलगावी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद
लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक एस. के. पांढरे हे पथकासह रात्री गस्त घालत असतांना सुमतीनगर येथे रविवारी अडीच वाजेच्या सुमारास जय बाबाजी बंगल्याच्या दरवाज्यासमोर पाच-सहा जण संशयास्पद हालचाली करताना दिसले. त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून लोखंडी रॉड सह टामी , लहान व मोठा स्क्रू ड्रायव्हर , पकड , दोन गलोरी, एक बॅटरी , दोन मोबाईल व एमएच०१ सी ए १३९३ क्र मांक असलेली आकाशी रंगाची इंडिया कार असा ८३३०० रूपयांचा ऐवज जप्त केला. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर तालुक्यातील शिरसगाव येथील शाहरूख महंमद पठाण (२१) , अनिल नंदू पवार(२४) , आकाश प्रकाश वाघमारे(२१) व दत्तात्रय पंढरीनाथ बर्डे (२१) यांना ताब्यात घेतले असून दोन साथीदार फरार झाले. हे सहा जण दरोडा टाकण्याचे तयारीत घुटमळत होते. या प्रकरणी पोलिस कर्मचारी योगेश शिंदे यांच्या फिर्यादीनुसार लासलगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला असुन अधिक तपास नाशिकचे पोलिस अधीक्षक संजय दराडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड व पोलिस उपअधिक्षक माधव पडीले तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक करपे यांच्या मार्गर्शनाखाली लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.के.पांढरे अधिक तपास करीत आहेत .