शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

ढोलबारेत पाण्यासाठी ग्रामस्थांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:39 IST

बागलाणमधील अभूतपूर्व दुष्काळाचे वास्तव चित्राने सर्वत्र पाणीटंचाईच्या झळा असल्याचे दिसून येत आहे. अन्नपाण्याच्या शोधार्थ ढोलबारे गाव सहा महिन्यांपासून बंद असून, दुष्काळाच्या झळा सोसत बागलाण तालुका पाण्यासाठी व्याकूळ झाला आहे.

सटाणा : बागलाणमधील अभूतपूर्व दुष्काळाचे वास्तव चित्राने सर्वत्र पाणीटंचाईच्या झळा असल्याचे दिसून येत आहे. अन्नपाण्याच्या शोधार्थ ढोलबारे गाव सहा महिन्यांपासून बंद असून, दुष्काळाच्या झळा सोसत बागलाण तालुका पाण्यासाठी व्याकूळ झाला आहे. तालुक्यातील ढोलबारे येथील दीडशे घरांपैकी ऐंशी घरांतील रहिवाशी स्वत:च्या पोटापाण्यासह जनावरांच्या चाऱ्याच्या शोधार्थ गेल्या सहा महिन्यांपासून वणवण भटकंतीला निघाल्याने गाव बंद असल्याचे भयावह चित्र बघायला मिळत आहे. पाण्यासाठी घरे बंद करून भटकंतीला निघालेले हे गाव बागलाण तालुक्यातील अभूतपूर्व दुष्काळाचे वास्तव सांगणारे चित्र  आहे.सटाणा शहरापासून सुमारे चौदा किलोमीटर अंतरावर उत्तरेकडे शिर्डी साक्री या राष्ट्रीय महामार्गावरील छोट्याशा टेकडीवर वसलेले ढोलबारे हे बाराशे लोकवस्तीचे गाव. या गावातील रहिवाशांचा शेती, मजुरी आणि मेंढपाळ हा मुख्य व्यवसाय आहे.पाच वर्षांपासून पाणीटंचाई पाचवीलाच पूजलेली...पाऊस पडेल तर शेती. आणि शेती पिकली तर मजुरी मिळेल. पीक चांगले आले तर जनावरांना चारा मिळेल, असे निसर्गाचे चक्र. परंतु ढोलबारे गावची भौगोलिक रचना अशी आहे की, गावाचा शिवाराच मुरमाड, खडकाळ आहे. त्यामुळे पाऊस चांगला झाला तर शेती पिकेल. मात्र गेल्या चार-पाच वर्षांपासून कमी पर्जन्यमानामुळे पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य आहे. त्यामुळे गावात पाणीटंचाई पाचवीलाच पूजलेली. यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईने डोके वर काढले. विहिरी आटल्याने दुष्काळाच्या झळा असह्य झाल्या आहेत. पाणीटंचाईमुळे माणसासह जनावरेही कासावीस झाली आहेत. स्वत:च्या पोटापाण्यासह जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाल्याने गावातील सुमारे ऐंशी कुटुंब घराला टाळे ठोकून चारा-पाण्याच्या शोधार्थ भटकंतीला निघाली आहेत. यामुळे डिसेंबर महिन्यापासून ढोलबारे गाव बंद आहे. यंदा चांगला पाऊस झाला तर गाव उघडण्याची शक्यता आहे, असे भयावह चित्र बघायला मिळत आहे.पाणी योजनांमध्ये भ्रष्टाचारसहा वर्षांपूर्वी गावात सार्वजनिक पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. पाण्याचा शाश्वत स्रोत नसताना संबंधित ठेकेदाराने आधी पाण्याच्या टाकीचे बांधकाम केले. त्यानंतर अंतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे काम केले. पाणी नसल्यामुळे टाकीत पाणीच पडले नाही. निकृष्ट दर्जाचे बांधकामामुळे योजना धूळ खात पडून आहे. शासनाचे लाखो रु पये पाण्यात गेले आहे.एक टॅँकर भागवतोय तहान...गावाच्या पूर्वेला आदिवासी वस्ती आहे. या वस्तीसाठी दहा हजार लिटर क्षमतेच्या टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र हे पाणी कमी पडत असल्याने पाणीटंचाई जैसे थे आहे. शासनाने परिसरात शौचालये दिली मात्र पाणी दिले नाही. त्यामुळे पाणीटंचाईमुळे हगणदारीमुक्त योजनेला तडा गेला आहे. टॅँकरच्या खेपा वाढवून मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पिण्यासाठी महिलावर्गाला भटकंती करावी लागत आहे. 

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणी