शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

निमाणी बसस्थानक स्थलांतरित करा

By admin | Updated: October 9, 2015 23:59 IST

आयुक्तांसमवेत बैठक : पालकांनी केली मागणी

नाशिक : पंचवटीतील सेवाकुंज परिसरात गेल्या बुधवारी बसखाली चिरडून रोनित चौहान या बालकाचा बळी गेल्यानंतर आर.पी. विद्यालयातील विद्यार्थ्यांचे पालक तसेच परिसरातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेत विविध सूचना मांडल्या. यावेळी निमाणी बसस्थानक आडगाव आगारमध्ये स्थलांतरित करावे आणि सेवाकुंज परिसरात पादचारी पूल उभारण्याची मागणी करण्यात आली. गेल्या बुधवारी रोनित चौहान या शालेय विद्यार्थ्याचा बसखाली चिरडून मृत्यू झाल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. परिसरातील आर. पी. विद्यालयातील पालक तसेच नागरिकांनी शुक्रवारी महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शांताराम अवसरे आदि उपस्थित होते. यावेळी आर. पी. विद्यालयाजवळ रस्त्यावर त्वरित रॅम्बलर टाकावेत, बंद पडलेला सिग्नल सुरू करण्यात यावा, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत होणाऱ्या भाजीपाला वाहनांची वाहतूक रासबिहारी शाळेमार्गे वळविण्यात यावी तसेच सेवाकुंज याठिकाणी पादचारी पूल उभारण्यासाठी सर्वेक्षण करावे आदि मुद्यांवर ऊहापोह झाला. त्याचबरोबर वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण ठरलेले निमाणी बसस्थानक आडगाव येथील बस आगारात स्थलांतरित करावे आणि बसआगार निमाणी बसस्थानक परिसरात आणावेत. त्यामुळे निमाणीजवळील वाहतूक कोंडी कमी होईल, अशी सूचनाही पुढे आली. या सूचनांवर विचार करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. (प्रतिनिधी)