म्हसरूळला युवतीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 00:48 IST2020-11-14T00:47:40+5:302020-11-14T00:48:14+5:30
म्हसरूळ परिसरातील वैतागवाडी येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी प्रदीप राजेंद्र बोधवडे याच्यावर बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

म्हसरूळला युवतीवर अत्याचार
पंचवटी : म्हसरूळ परिसरातील वैतागवाडी येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी प्रदीप राजेंद्र बोधवडे याच्यावर बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपी बोधवडे हादेखील म्हसरूळच्या वैतागवाडीत राहणारा असून, त्याने आपल्या शेजारीच राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावली व ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान सदर युवतीच्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेत वेळोवेळी जाऊन बलात्कार केला. सदरची बाब युवतीच्या कुटुंबीयांना कळताच तिच्या आईने पोलिसांत तक्रार दिली. अधिक तपास म्हसरूळ पोलीस करीत आहेत.