विद्यार्थ्यांनी अनुभवली शासकीय कामाची पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 01:01 IST2020-01-30T22:20:45+5:302020-01-31T01:01:02+5:30

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाळोटी माथा, भेंडाळी येथील मुलांची क्षेत्रभेट निफाड तहसील कार्यालयात आणि पंचायत समिती पाहणी दौरा केला.

The method of government work experienced by the students | विद्यार्थ्यांनी अनुभवली शासकीय कामाची पद्धत

तहसील कार्यालयात विद्यार्थ्यांसमवेत तहसीलदार दीपक पाटील व कर्मचारी.

ठळक मुद्देसायखेडा : तहसीलदारांनी स्वखर्चाने दाखविला सिनेमागृहात तान्हाजी चित्रपट

सायखेडा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाळोटी माथा, भेंडाळी येथील मुलांची क्षेत्रभेट निफाड तहसील कार्यालयात आणि पंचायत समिती पाहणी दौरा केला.
दरम्यान यावेळी कार्यालय पाहत असताना तहसीलदार दीपक पाटील व विद्यार्थी यांच्यात संवाद सुरू होता. मुले अनेक प्रश्न पाटील यांना विचारीत होते. पाटील यांनी मुलांना तुम्हाला काय हवे आहे अशी विचारणा करताच त्यातील काही मुलांनी आम्हाला तान्हाजी सिनेमा पहायचा आहे, अशी इच्छा व्यक्त केली.
क्षणाचाही विलंब न करता पाटील यांनी निफाड शहरातील रविराज सिनेमागृहात स्वखर्चाने मुलांना सिनेमा दाखवायला घेऊन गेले. मुलांसोबत बराच वेळ घालविला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाळोटी माथा शाळेतील शिक्षक बाजीराव कमानकर व जयश्री पवार यांनी मुलांना शासकीय कार्यालये आणि तेथील कामकाज कसे असते हे दाखविण्यासाठी क्षेत्रभेट म्हणून निफाड तहसील कार्यालय आणि पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूसंपादन विभाग, वृत्तपत्र कार्यालय येथे अनोखी क्षेत्रभेट काढली.
या उपक्र मासाठी शाळेला तहसीलदार दीपक पाटील, गटविकास अधिकारी संदीप कराड, गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार, केंद्रप्रमुख ओंकार वाघ यांचे मार्गदर्शन मिळाले.
तहसीलदार पाटील तहसीलदार होण्याअगोदर प्राथमिक शिक्षक होते. त्यामुळे एका शिक्षकातील विद्यार्थ्याप्रति असलेला भाव जागृत झाला व त्यांनी मुलांचे समाधान केले. एक वरिष्ठ अधिकारी अशा प्रकारे सहानुभूतीपूर्वक मुलांचा विचार करीत त्यांची इच्छा पूर्ण करतो असा आगळावेगळा अनुभव शिक्षक व कर्मचारी यांना आल्याने त्यांनी देखील समाधान व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देत प्रशासनाची जबाबदारी सांगितली.
हाळोटी माथा भेंडाळी या शाळेतील शिक्षक सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्र म राबवित असतात, क्षेत्रभेट निसर्गरम्य ठिकाणी न नेता प्रशासकीय कामकाजाची माहिती मुलांना व्हावी अशा ठिकाणी आणली आणि मुलांना प्रत्यक्ष अनुभूती दिली, मुलांनी अनेक प्रश्न विचारून कामकाजाची माहिती करून घेतली.
- केशव तुंगार, गटशिक्षणाधिकारी, निफाड.

Web Title: The method of government work experienced by the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.