'Message sent by the saints serving the saints' | ‘साधू-संतांची सेवा करत महंतांनी दिला संदेश’
‘साधू-संतांची सेवा करत महंतांनी दिला संदेश’

नाशिक : महंत श्यामसुंदरदास यांनी अनेक साधू-संतांची सेवा करत इतर साधूंसमोर आदर्श ठेवला. तपोवनात त्यांनी वास्तव्य करत असताना त्यांच्याकडे येणाऱ्या साधू-संतांची मनोभावे सेवा करत त्यांना कधीही उपाशीपोटी जाऊ दिले नाही, असे प्रतिपादन पंचमुखी हनुमान येथील महंत भक्तिचरणदास यांनी केले.
बटुक हनुमान मंदिर येथील श्रीश्री १००८ महंत श्यामसुंदरदास महाराज यांचे निधनाबद्दल तपोवनातील बटुक हनुमान मंदिर येथे विविध साधू-संतांच्या वतीने शोकसभा आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शहरातील विविध आखाड्यांच्या साधू-महंतांनी त्यांच्या निधनामुळे शोक व्यक्त करत त्यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी दिगंबर आखाड्याचे रामकिशोरदास शास्त्री, गोरेराम मंदिराचे राजारामदास, चतु:संप्रदाय आखाड्याचे कृष्णचरणदास, खाकी आखाड्याचे भगवानदास, महंत सर्वेश्वरदास, काट्या मारुती मंदिराचे महंत शिवकुमारदास, हरिष वल्लभदास मखवाना, लक्ष्मीनारायण मंदिराचे महंत नृसिंहाचार्य, भोलदास मठाचे महंत महेशगिरी महाराज, दिल्ली येथील कल्याणदासजी महाराज, ध्यानधारी बालकदासजी महाराज उपस्थित होते.

Web Title:  'Message sent by the saints serving the saints'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.