मेशी : एकोणीस वर्षाची भारतीय लष्करी सेनेच्या माध्यमातुन देशसेवा करून मेशी येथील भूमिपुत्र कमलेश जोंधळे व मिलिंद आहेर हे जवान सेवानिवृत्त झाल्यामुळे मेशी येथे त्यांचे ग्रामस्थांनी जंगी स्वागत करण्यात केले. या जवानांची गावातून भव्य सजविलेल्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली.हे जवान १०९ इंजिनिअर बटालियनमध्ये कार्यरत होते. सेवा निवृत्ती नंतर ते आपल्या जन्मभुमीत परतले. यावेळी गावात ठिक ठिकाणी सुवासिनींनी या दोघा जवानांचे औक्षण केले. मिरवणूकीत दोन्ही जवानांच्या पत्नीही सहभागी झाल्या होत्या. यावेळी मेशीचे माजी सरपंच केदा शिरसाट यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी गावकऱ्यांनी भारतमातेचा जयघोष करत आनंद साजरा केला. कार्यक्रमाला मेशीचे लोकनियुक्त सरपंच सुनंदा अहिरे, उपसरपंच भिका बोरसे, बापू जाधव, शाहू शिरसाठ, सतीश बोरसे आदींसह ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.याच गावातील आयपीस अधिकारी केतन कदम हे देखील यावेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे महिलाही या कार्यकमात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
जन्मभुमीत परतलेल्या जवानांचा मेशी मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 16:37 IST
मेशी : एकोणीस वर्षाची भारतीय लष्करी सेनेच्या माध्यमातुन देशसेवा करून मेशी येथील भूमिपुत्र कमलेश जोंधळे व मिलिंद आहेर हे जवान सेवानिवृत्त झाल्यामुळे मेशी येथे त्यांचे ग्रामस्थांनी जंगी स्वागत करण्यात केले. या जवानांची गावातून भव्य सजविलेल्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली.
जन्मभुमीत परतलेल्या जवानांचा मेशी मिरवणूक
ठळक मुद्देगावात आनंदोत्सव : सडारांगोळ्या काढून जोरदार स्वागत