भरवीर बुद्रूक माध्यमिक विद्यालयात गुणवंतांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 18:12 IST2020-09-09T18:11:48+5:302020-09-09T18:12:50+5:30
नांदूरवैद्य : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी व बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मविप्रचे तालुका संचालक भाऊसाहेब खातळे यांच्या हस्ते व मुख्याध्यापक सी. बी. रूपवते यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

भरवीर बुद्रुक येथील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराप्रसंगी सी.बी. रूपवते. समवेत शिवाजी झनकर, सुधाकर झनकर, साहेबराव झनकर आदी.
नांदूरवैद्य : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी व बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मविप्रचे तालुका संचालक भाऊसाहेब खातळे यांच्या हस्ते व मुख्याध्यापक सी. बी. रूपवते यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
अनुष्का झनकर, साक्षी पावसे, गायत्री झनकर, गौरी झनकर व श्रृती वाणी या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कारार्थींमध्ये समावेश होता. याप्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष शिवाजी झनकर, साहेबराव झनकर, सुधाकर झनकर, एकनाथ झनकर, नवनाथ झनकर, संजय झनकर, एन.एम. कासार, ए.डी. पवार, डी.एच.जाधव, जी.एस.नागरे, एस.आर. सानप, बर्गे एन. के. बर्गे, अविनाश सहाणे आदी पस्थित होते.