लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : नाशिकरोड-देवळाली व्यापारी बॅँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शुक्रवारी अखेरच्या दिवशी सत्तारूढ गटाच्या दोन विद्यमान संचालकांसह एकूण ३० जणांनी माघार घेतली असून, ४९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सहकार पॅनलने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे.व्यापारी संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान होणार असून, एकूण ७९ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सत्तारूढ गटाचे संचालक वामनराव हगवणे, सुरेश गायकवाड यांच्यासह एकूण ३० जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असून, ४९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.सर्वसाधारण गटाच्या १६ जागांसाठी दत्ता गायकवाड, निवृत्ती अरिंगळे, डॉ. डी. जी. पेखळे, अशोक सातभाई, श्रीराम गायकवाड, सुनील आडके, मनोहर कोरडे, राजीव टर्ले, हेमंत गायकवाड, सतीश मंडलेचा, जयंतीलाल लाहोटी, चंद्रकांत विसपुते, जयप्रकाश गायकवाड, राजेश जाधव, वसंत अरिंगळे, भाऊसाहेब पाळदे, अशोक चोरडिया, प्रकाश घुगे, राधेय मालपाणी, अरुण जाधव, सुनील चोपडा, योगेश नागरे, जयप्रकाश घंटे, डॉ. प्रशांत भुतडा, जगन आगळे, मुकुंद आढाव, प्रकाश गोहाड, संतोष क्षीरसागर, भरत ढोले, रमेश धोंगडे, रमेश पाळदे, अन्सारी, रूदुलअमीन कमरूद्दीन, गंगाधर उगले, सुनील बोराडे, तौफिक खान, विलास पेखळे, अतुल धनवटे, दिनकर पाळदे.महिला गटाच्या २ जागांसाठी रंजना बोराडे, कमल आढाव, जयश्री गायकवाड, अनिता करंजकर, इतर मागासवर्ग १ जागा- सुधाकर जाधव, सुदाम ताजनपुरे, अनुसूचित जाती-जमाती गट १ जागा- रामदास सदाफुले, प्रशांत दिवे, भटक्या विमुक्त जाती- १ जागा - श्याम चाफळकर, हनुमंता देवकर, केशव गोसावी असे एकूण ४९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. तीन गटात आमने-सामने लढतइतर मागासवर्ग गटात सहकार पॅनलचे सुधाकर जाधव, श्री व्यापारीचे सुदाम ताजनपुरे, अनुसूचित जाती-जमाती गट रामदास सदाफुले (सहकार), नगरसेवक प्रशांत दिवे (श्री व्यापारी), महिला राखीव दोन जागा- रंजना बोराडे, कमल आढाव (सहकार), जयश्री गायकवाड, अनिता करंजकर यांच्यात आमने-सामने लढत होणार आहे. तर भटक्या विमुक्त गटात श्याम चाफळकर (सहकार), हनुमंता देवकर (श्री व्यापारी), केशव गोसावी (अपक्ष) असे तीन उमेदवार रिंगणात आहेत. तर सर्वसाधारण गटाच्या १६ जागांसाठी ३८ उमेदवार रिंगणात आहेत.
व्यापारी बॅँक निवडणुकीत ४९ उमेदवार रिंगणात
By admin | Updated: June 10, 2017 01:45 IST