बंद पाणी मीटरबाबत मनपातर्फे नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 01:08 IST2018-08-11T01:08:32+5:302018-08-11T01:08:58+5:30

नाशिकरोड : परिसरात मनपा पाणीपट्टी वसुली विभागाकडून पाण्याची बिले देण्याबरोबर जुनाट बंद पडलेले पाणी मीटर बदलण्याबाबत रहिवाशांना नोटिसा देण्यात येत आहे. आतापर्यंत १७० जणांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

Mentafa notice on closed water meter | बंद पाणी मीटरबाबत मनपातर्फे नोटिसा

बंद पाणी मीटरबाबत मनपातर्फे नोटिसा

नाशिकरोड : परिसरात मनपा पाणीपट्टी वसुली विभागाकडून पाण्याची बिले देण्याबरोबर जुनाट बंद पडलेले पाणी मीटर बदलण्याबाबत रहिवाशांना नोटिसा देण्यात येत आहे. आतापर्यंत १७० जणांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
नाशिकरोड परिसरामध्ये घरगुती ३० हजार ११, व्यावसायिक ५२४, बिगर घरगुती ११२६ असे एकूण ३१ हजार ६६१ पाण्याचे कनेक्शन आहेत. मनपा पाणीपट्टी वसुली विभागाकडून कनेक्शन धारकांना पहिल्या सहा महिन्यांचे पाणीबिल देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पाणीपट्टी साठी रिडिंग घेताना जे जुनाट पाणी मीटर बंद आहे त्यांची नोंद करण्यात येत आहे.
पाणीबिलासोबत पाणी मीटर बदलण्याबाबत रहिवाशांना नोटिसा देण्यात येत आहे. आतापर्यंत १७० जणांना बंद पाणी मीटर बदलण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत.
यंदा पहिल्या सहा महिन्यांची पाणीबिले मनपा प्रशासनाकडून तत्काळ देण्यात येत असल्याने कनेक्शनधारकांना सुखद धक्का बसला आहे. परिसरात अधिकृत पाणी कनेक्शन सोबत अनधिकृत पाण्याचे कनेक्शनदेखील खुप आहे.

Web Title: Mentafa notice on closed water meter