माजी विद्यार्थ्यांचा आठवणींना उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:52 IST2018-04-03T00:52:38+5:302018-04-03T00:52:38+5:30
बीवायके महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते सुमारे ३८ वर्षांनंतर १९८० च्या बॅचच्या बीकॉमच्या आयोजित स्नेहमेळाव्याचे. सुमारे ६०च्या आसपास वय असलेल्या सर्व मित्रांनी त्यांनी विशीत असतानाचे आपले अनुभव एकमेकांना कथन करत महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला.

माजी विद्यार्थ्यांचा आठवणींना उजाळा
नाशिक : बीवायके महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते सुमारे ३८ वर्षांनंतर १९८० च्या बॅचच्या बीकॉमच्या आयोजित स्नेहमेळाव्याचे. सुमारे ६०च्या आसपास वय असलेल्या सर्व मित्रांनी त्यांनी विशीत असतानाचे आपले अनुभव एकमेकांना कथन करत महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला. बीवायके महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या या स्नेहमेळाव्याने सर्व वातावरण भारावून गेले होते. पुन्हा एकदा गप्पा, गोंधळ, आरडाओरड यामुळे परिसर गजबजून गेला होता. हॉटेल फर्माईश येथे झालेल्या या कार्यक्रमात संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम संजय घुगे, गोविंद भट्ट, रामगोपाल धूत, सुभाष जाधव आदींनी आयोजित केला होता. प्रास्ताविक संजय घुगे यांनी केले. आसावरी भाटे यांनी स्वागतगीत सादर केले. गोपाल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अशोक सावंत यांनी महिन्यातून एकदा एकत्रित येऊन समाजोपयोगी काम करण्याचा संकल्प सोडला. याप्रसंगी मिलिंद पानसे, योगेश ठक्कर, सुधीर कुलकर्णी, उदय काळे, उल्हास पाठक, अरविंद पात्रे, वैजयंती गाडगीळ, विकास गरुड, संदीप भावसार, अंजली कुलकर्णी, विजयमास जोशी आदि उपस्थित होते.