शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

महिला बालकल्याण समिती सभेत सदस्य आक्रमक

By admin | Updated: January 15, 2015 00:10 IST

विचारला जाब : कामे होत नसल्याची तक्रार

नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची सभा होऊन सर्व महिला सदस्यांनी कामे होत नसल्याची तक्रार करत प्रशासनाला जाब विचारला. कामे होत नसतील तर सामूहिक राजीनामे देत समिती बरखास्त करण्याचा इशाराही सदस्यांनी दिला. दरम्यान, समितीमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षण उपक्रमांबाबतही जोरदार चर्चा झाली.महिला व बालकल्याण समितीची सभा सभापती रंजना बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. नियोजित वेळेत उपआयुक्त गोतिसे हजर न राहिल्याने विलंबाने सुरू झालेल्या सभेच्या प्रारंभीच महिला सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. गेल्या तीन महिन्यांपासून कामे रखडली असल्याची तक्रार करतानाच, वंचित बालकांच्या मेळाव्यासंबंधीची फाईलही टेबलांवर फिरत असल्याचे सभापतींनी निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण उपक्रमासंबंधी सदर ठेकेदाराच्या कार्यपद्धतीबद्दलही रोष व्यक्त करण्यात आला. दरम्यान, महिला व बालकल्याण समितीचा पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बंगळुरू महापालिकेचा अभ्यास दौरा करण्यासाठी पाच लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यासंबंधीचे पत्र ठेवण्यात आले. कराटे प्रशिक्षण वर्ग येत्या २६ जानेवारीपासून सुरू करण्यास संमती देण्यात आली. बैठकीत सदस्यांनी मांडलेल्या विषयांना मंजुरी देण्यात आली. त्यात हळदीकुंकू कार्यक्रम राबविणे, अंगणवाडीसाठी साहित्य खरेदी, अंगणवाडीतील सुमारे साडेतेरा हजार बालकांना गणवेश व ओळखपत्र देणे, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना ड्रेसकोड लागू करणे आदि विषयांना मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी)