शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मेळा सारस्वतांचा : २६ ते २८ मार्चदरम्यान रंगणार साहित्य संमेलन?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 5:43 AM

नाशिकला होणारे हे तिसरे साहित्य संमेलन असून, यंदाचे संमेलन हे कोविडच्या पार्श्वभूमीवर होणार आहे. त्यामुळे या संमेलनासाठी सर्वाधिक महत्त्वाची बाब ही रसिक आणि साहित्यिकांची सुरक्षितता राहणार आहे.

नाशिक  : गोदातीरावरील भूमीत रंगणारे ९४ वे साहित्य संमेलन मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात २६ ते २८ मार्चदरम्यान होण्याची चिन्हे आहेत. या संमेलनाच्या तारखांची अधिकृत घोषणा साहित्य महामंडळाकडून लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. नाशिकला होणारे हे तिसरे साहित्य संमेलन असून, यंदाचे संमेलन हे कोविडच्या पार्श्वभूमीवर होणार आहे. त्यामुळे या संमेलनासाठी सर्वाधिक महत्त्वाची बाब ही रसिक आणि साहित्यिकांची सुरक्षितता राहणार आहे. त्यामुळेच साहित्य संमेलनाची तारीख मार्च महिन्यात अधिकाधिक अखेरच्या टप्प्यात ठेवण्याचे नियोजन  महामंडळाने केले आहे. त्यातही साहित्य रसिकांच्या दृष्टीने शुक्रवार ते रविवार हा कालावधी नेहमीच सोयीस्कर ठरत असल्याने यंदाच्या साहित्य संमेलनासाठीही शुक्रवार (२६ मार्च) ते रविवार (२८ मार्च) या कालावधीतच संमेलन रंगण्याची चिन्हे आहेत. २६ मार्चला ध्वजारोहण, ग्रंथदिंडी आणि साहित्य संमेलनाचे उद्घाटन, २७ मार्चला विविध परिसंवाद, चर्चा, कवी संमेलन आणि २८ मार्चला साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे. २८ मार्चला होळीसह रविवार आणि २९ मार्चला धूलिवंदनाची सुट्टी असल्याने बाहेरगावच्या रसिकांसाठीही या तारखा सोयीस्कर ठरणार असल्याने त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत.  मराठी रसिकांचे दैवत असलेल्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या टिळकवाडीतील निवासस्थानापासून ग्रंथदिंडीचा प्रारंभ करण्यात येणार आहे. तसेच या ग्रंथदिंडीत ग्रंथांच्या पालखीसह नाशिकच्या परिघातील आदिवासी परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या बोहाडा नृत्यासह लोककलांचेदेखील दर्शन घडविण्यात येणार आहे. 

साहित्य संमेलनाचे प्रक्षेपण विभागीय केंद्रांवरकोरोनामुळे आसन व्यवस्थादेखील एक आसनाची जागा सोडून होणार आहे. संमेलनाचा लाइव्ह आनंद अधिकाधिक रसिकांना घेता यावा, यादृष्टीने राज्यातील सर्व विभागांच्या शहरांमधील मुख्य सांस्कृतिक केंद्रांवर भव्य स्क्रीनवर प्रक्षेपण करण्याचा आयोजक लोकहितवादी मंडळाचा मानस आहे.

संमेलनाध्यक्ष होण्यासाठी भारत सासणे उत्सुक -मराठवाडा साहित्य परिषदेकडून संमेलनाध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या नावाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. संमेलनाध्यक्ष होण्यासाठी आपण होकार दिल्याचे सासणे  यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.  सासणे म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच याविषयीची विचारणा झालेली होती आणि त्यांच्याकडून प्रस्ताव येताच मी नाशिक येथे होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या प्रस्तावाला होकार कळविलेला होता. सासणे यांच्यासोबतच ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, संत आणि लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, विचारवंत जनार्दन वाघमारेंकडूनही संमेलनाध्यक्षाच्या प्रस्तावासाठी होकार आलेला आहे. साहित्य महामंडळाचे मौन -- घटक संस्था आणि संलग्न संस्थांनी संमेलनाध्यक्ष पदासाठीची त्यांची प्रस्तावित नावे साहित्य महामंडळाकडे २० जानेवारीपर्यंत पाठवायची होती. - किती नावांचे प्रस्ताव आले आहेत, याविषयी विचारणा केली असता साहित्य महामंडळाने यावर मौन बाळगणेच पसंत केले. - याविषयीचा खुलासा नाशिक येथे होणाऱ्या बैठकीतच केला जाईल, असे साहित्य महामंडळाचे कार्यवाह डॉ. दादा गोरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nashikनाशिकliteratureसाहित्य