मेहुल चोकसीने ५३ हजार कोटी लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 00:27 IST2019-02-12T00:05:33+5:302019-02-12T00:27:44+5:30
पंजाब नॅशनल बँकेतून १४ हजार कोटींचे कर्ज घेऊन परदेशी फरार झालेल्या मेहुल चोकसीने केवळ पीएनबी बँकेलाच नव्हे, तर देशातील विविध बँकांना तब्बल ५३ हजार ८९८ कोटी ३० लाख रुपयांना लुटल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ता देवांग जानी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

मेहुल चोकसीने ५३ हजार कोटी लुटले
नाशिक : पंजाब नॅशनल बँकेतून १४ हजार कोटींचे कर्ज घेऊन परदेशी फरार झालेल्या मेहुल चोकसीने केवळ पीएनबी बँकेलाच नव्हे, तर देशातील विविध बँकांना तब्बल ५३ हजार ८९८ कोटी ३० लाख रुपयांना लुटल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ता देवांग जानी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. मेहुल चोकसीने विविध बँकांकडून काढलेल्या कर्जाविषयीची माहिती माहितीच्या अधिकारात उपलब्ध झाल्याचा दावा त्यांनी केला असून, चोकसीने भारत सरकारच्या कार्पोरेट मंत्रालयाला सादर केलेल्या कागदपत्रांचाही आधार त्यांनी आपल्या आरोपांना दिला आहे.
५३ हजार ८९८ कोटींचे कर्ज घेतल्याचा दावा
मेहुल चोकसीची गीतांजली जेम्स लिमिटेड आणि तिच्या सहयोगी तथा बनावट १९ कंपन्यांच्या संचालकांनी पंजाब नॅशनल बँकेव्यतिरिक्त अन्य सार्वजनिक क्षेत्रातील व खासगी क्षेत्रातील ५३ हजार ८९८.३० कोटींचे कर्ज घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे.
नाशिकमधील रद्द झालेल्या इगतपुरी सेझ प्रकल्पातील मल्टि सर्व्हिसेस कंपनीच्या नावावर मेहुल चोकसीने जवळपास तीन हजार ८६० कोटींचे कर्ज काढल्याचा दावा जानी यांनी गेल्या महिन्यात केला होता. त्यानंतर याप्रकरणी सोमवारी (दि. ११) पुन्हा आणखी एक खुलासा त्यांनी केला. या प्रक रणी तपास यंत्रणांकडून चौकशीत कसूर होत असल्यानेच अजूनही ही माहिती समोर येऊ शकल्याचा आरोप करतानाच या प्रकरणाची कसून चौकशी केल्यानंतर पीएनबी बँकेप्रमाणेच अन्य बँकाही अडचणीत येतील, असे भाकीतही त्यांनी वर्तवले आहे.