रविवारी मेगाब्लॉक भुसावळ-पुणे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:51 IST2019-02-09T00:50:19+5:302019-02-09T00:51:35+5:30

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी (१० फेब्रुवारी) पॉवर ब्लाक घेण्यात आल्याने अप-डाऊनची भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

Mega Blocks on Sunday, Bhusaval-Pune canceled | रविवारी मेगाब्लॉक भुसावळ-पुणे रद्द

रविवारी मेगाब्लॉक भुसावळ-पुणे रद्द

नाशिकरोड : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी (१० फेब्रुवारी) पॉवर ब्लाक घेण्यात आल्याने अप-डाऊनची भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून मेगा ब्लॉक घेण्यात आल्याने रविवारी भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ११०२५) व पुणे-भुसावळ (गाडी क्रमांक ११०२६) रद्द करण्यात आल्याचे रेल्वे सूत्रांनी कळविले आहे. गेल्या महिन्यापासून नाशिकरोड रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांना मेगा ब्लॉकचा चांगलचा फटका बसत आहे. अनेक गाड्या रद्द होत असल्याने प्रवशांची तरांबळ होत असून तिकिटाचे पैसे मिळणावरुन वाद होत आहे.

Web Title: Mega Blocks on Sunday, Bhusaval-Pune canceled