विविध शाळांच्या शिक्षकांचे संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:38 IST2019-04-26T00:38:05+5:302019-04-26T00:38:24+5:30

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या विविध शाळा, महाविद्यालयांतील शिक्षकांचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.

 Meeting of teachers of various schools | विविध शाळांच्या शिक्षकांचे संमेलन

विविध शाळांच्या शिक्षकांचे संमेलन

नाशिकरोड : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या विविध शाळा, महाविद्यालयांतील शिक्षकांचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित स्नेहसंमेलन उद्घाटनास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर कुलकर्णी, नाशिकरोड संकुल प्रमुख वसंत जोशी, शाळा समिती अध्यक्ष जयंत मोंढे, सुरेखा पुरकर, मंगेश कुलकर्णी, प्राचार्य प्र. ला. ठोके, लीना पांढरे, मुख्याध्यापिका संजीवनी धामणे, मंगला गोविंद, ज्योती मोदीयानी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल, आरंभ महाविद्यालय, श्रीमती र. ज. चौव्हाण बिटको गर्ल्स हायस्कूल, कै. बिंदू रामराव देशमुख महिला महाविद्यालय, जयकुमार टिबरेवाला इंग्लिश मीडियम स्कूल, नवीन मराठी शाळा, संगीत महाविद्यालय आदी शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी गायन, वाद्यवादन, एकपात्री प्रयोग, समूहनृत्य आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

Web Title:  Meeting of teachers of various schools