Meeting of Santosh Vidyalaya | संतोष विद्यालयाचे स्नेहसंमेलन

बाभूळगाव येथील संतोष माध्यमिक विद्यालय व ज्यु. कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचा गौरव करताना संदीप कोळी, सुरेखा दराडे, रूपेश दराडे, संदीप देशपांडे आदी.

येवला : बाभूळगाव येथील जगदंबा शिक्षण संस्थेच्या संतोष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती सुरेखा दराडे, जगदंबा शिक्षण संस्थेचे संचालक रूपेश दराडे, कवी संदीप देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती, तर सोहळ्याचा समारोप पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
प्राचार्य जी. एस. येवले यांनी प्रास्ताविक केले. प्रज्ञा वळवी, प्रणव हिरे व कोमल गुंजाळ यांना आदर्श विद्यार्थी म्हणून गौरविण्यात आले, तर विविध खेळातील राज्यस्तरावर यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. विभागप्रमुख संतोष विंचू, प्रदीप पाटील, किरण पैठणकर, रोहिणी केंगे, श्वेता कोकणे यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य आप्पासाहेब कदम, व्ही.आर. परदेशी, दत्ता खोकले, संतोष खंदारे, मनोज खैरे, भाऊसाहेब अनर्थे, राहुल गोलाईत आदींनी संयोजन केले. दरम्न्यान, विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनात विविध कलाविष्कारांचे सादरीकरण करत रसिकांकडून टाळ्यांची दाद मिळवली.

Web Title: Meeting of Santosh Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.