शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

डांगसौंदाणे येथे नियोजनासाठी बैठक

By admin | Updated: September 22, 2016 00:26 IST

डांगसौंदाणे येथे नियोजनासाठी बैठक

डांगसौंदाणे : नाशिक येथे २४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मराठा क्र ांती मोर्चाच्या नियोजनासाठी येथील श्रीराम मंदिरात बैठक घेण्यात येऊन मार्चात मोठ्या संख्येने सहभागी होणाचा निर्धार करण्यात आला.यावेळी तुळजाभवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय सोनवणे यांनी उपस्थितांना मोर्चाच्या नियोजनासंदर्भात मार्गदर्शन केले. मराठा समाजबांधव व सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते एकत्र येणार असल्यामुळे मोर्चास महत्त्व प्राप्त झाले आहे. मार्चाला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी असे ठरविण्यात आले. परिसरातून जास्तीत जास्त पुरु ष व महिला, तरुणांनी मोर्चात सहभाग नोंदवावा, असे आवाहन सोनवणे यांनी यावेळी केले. नाशिक येथील मराठा क्र ांती मोर्चात सहभागी होण्यासाठी डांगसौंदाणे गावातून वाहनांची व्यवस्था केली आहे, असे सांगण्यात आले. यासाठी अनेक समाजबांधवानी आपली वाहने मोफत उपलब्ध करुन द्यावी असे ठरविण्यात आले.येत्या बुधवारी (दि.२२) कोपर्डी घटनेतील पीडित मुलीस व उरी येथील चकमकीत शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यासाठी कॅण्डल मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, कॅण्डल मार्चसाठी जास्तीतजास्त समाजबांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले. शेवटी उरी येथील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.बैठकीसाठी सोपान सोनवणे, अंबादास सोनवणे, महेंद्र सोनवणे, उदय सोनवणे, रवींद्र सोनवणे, आमोल सोनवणे, राकेश सोनवणे, राजेंद्र सोनवणे, सुशीलकुमार सोनवणे, हरी बोरसे, सागर चिंचोरे, तुषार बाविस्कर, महेश बोरसे, साहेबराव बोरसे, उमेश सोनवणे, महेश सोनवणे, निवृत्ती सोनवणे, मुन्ना सोनवणे, कडू सोनवणे, सचिन सोनवणे, संदीप सोनवणे, दीपक खैरनार, विजय सोनवणे, योगेश सोनवणे, बबलू सोनवणे आदिंसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)