ब्रह्मगिरी उत्खननस्थळी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची भेट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 10:11 PM2021-07-26T22:11:11+5:302021-07-26T22:12:32+5:30

त्र्यंबकेश्वर : आमदार हिरामण खोसकर यांच्यासह नायब तहसीलदार (प्रशासन), नाशिकहून आलेले पर्यावरणप्रेमी ब्रह्मगिरी उत्खनन टास्क फोर्सचे सदस्य त्र्यंबकेश्वरचे पर्यावरणप्रेमी ललित लोहगावकर, भूगर्भतज्ज्ञ डॉ. निकम, मनीष बावीस्कर, मंडलाधिकारी सुयोग वाघमारे, तलाठी संतोष जोशी, देवचंद महाले, गौरव पवार आदींसह लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी ब्रह्मगिरी उत्खननस्थळाची पाहणी केली.

Meeting of people's representatives and officials at Brahmagiri excavation site! | ब्रह्मगिरी उत्खननस्थळी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची भेट !

ब्रह्मगिरी उत्खननस्थळी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची भेट !

Next
ठळक मुद्देभूस्खलनामुळे काही भाग कोसळलेला दिसत आहे.

त्र्यंबकेश्वर : आमदार हिरामण खोसकर यांच्यासह नायब तहसीलदार (प्रशासन), नाशिकहून आलेले पर्यावरणप्रेमी ब्रह्मगिरी उत्खनन टास्क फोर्सचे सदस्य त्र्यंबकेश्वरचे पर्यावरणप्रेमी ललित लोहगावकर, भूगर्भतज्ज्ञ डॉ. निकम, मनीष बावीस्कर, मंडलाधिकारी सुयोग वाघमारे, तलाठी संतोष जोशी, देवचंद महाले, गौरव पवार आदींसह लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी ब्रह्मगिरी उत्खननस्थळाची पाहणी केली.

यावेळी जेथे ब्लास्टिंग केले तेथील काही भाग उत्खनन केल्याने व नंतर झालेल्या जिलेटिन्स कांड्याच्या ब्लास्टिंगमुळे झालेल्या भूस्खलनामुळे काही भाग कोसळलेला दिसत आहे. यावेळी आमदार हिरामण खोसकर यांनी भविष्यात संपूर्ण सुपलीची मेटेला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे या लोकांचा जीव वाचविण्यासाठी त्यांचे वेळीच स्थलांतर होणे गरजेचे आहे, असे सांगितले. या ठिकाणी असलेला वॉचमन कोणालाच आत प्रवेश करू देत नव्हता. पण आमदार खोसकर, नायब तहसीलदार निकम, टास्क फोर्सचे सदस्य आले असल्याचे सांगितल्यानंतर त्याने आत सोडले. माजी नगराध्यक्ष ललित लोहगावकर यांनादेखील प्रवेश नाकारण्यात आला होता.
ब्रह्मगिरी उत्खननप्रकरणी अत्यंत अवघड घटना घडत असल्याने खोसकर यांनी रविवारी शासकीय सुटी असतानाही अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. त्यामुळे आता या प्रकरणाला चालना मिळेल अशी चर्चा आहे. यावेळी सुपलीची मेट येथील रहिवाशांनी आमदारांची भेट घेऊन डिसेंबर २०२० मध्ये टेकड्या सपाटीकरण करण्याचे काम सुरू असताना तहसीलदारांना निवेदन दिले होते तरी निवेदनाचा गांभीर्याने विचार केला नाही. विशेष म्हणजे जिलेटिनच्या ८०० कांड्या तेथे पोहोचतात आणि असे ब्लास्टिंग करतात. यामुळे डोंगराच्या पाषाणाला तडे गेले असून, पावसाळ्यात पाणी झिरपते. त्यामुळे भूस्खलनामुळे सुपलीच्या मेटेला कधीही धोका पोहचू शकतो, असे भुगर्भतज्ज्ञ डॉ. निकम यांनी सांगितले.

एखाद्या गरीब शेतकऱ्याने जमीन सपाटीकरण करण्याचा प्रयत्न केला तर रात्री-बेरात्री खनिज ट्रक जप्त होतात. काम बंद पाडले जाते. तर मग येथील सुरुंगाच्या आवाज ट्रक, पोकलेन, जेसीबीचा धडधडाट सरकारी यंत्रणेला ऐकू कसा आला नाही, असा सवाल आमदार खोसकर यांनी करत वनविभाग व महसुली यंत्रणेच्या कारभारावर निशाणा साधला. (२६ त्र्यंबक १ ,२)

Web Title: Meeting of people's representatives and officials at Brahmagiri excavation site!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.