करंजवण पाणी योजनेबाबत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 01:11 IST2021-06-03T21:32:27+5:302021-06-04T01:11:30+5:30
मनमाड : शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी अपर मुख्य सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या समितीची करंजवण योजनेसंदर्भात गुरुवारी (दि.३) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली.

करंजवण पाणी योजनेबाबत बैठक
मनमाड : शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी अपर मुख्य सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या समितीची करंजवण योजनेसंदर्भात गुरुवारी (दि.३) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली.
मनमाड शहरात तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे मनमाड शहरातील जनता अत्यंत हवालदिल झाली आहे. त्यामुळे मनमाड शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी करंजवण योजना तात्काळ मंजूर करून योजनेस निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी यावेळी आमदार सुहास कांदे यांनी केली. यावर चर्चा होऊन सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, मनमाड शहराचा पाणी प्रश्न सुटण्याबाबत आशा पल्लवीत झाल्या आहेत. बैठकीस प्रधान सचिव जलसंपदा विभाग, मंत्रालय मुंबई, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, संचालक नगर परिषद प्रशासन किरण कुलकर्णी, आमदार सुहास कांदे, पाणीपुरवठा अभियंता शर्मा, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मुख्याधिकारी विजयकुमार मुंढे आदी अधिकारी उपस्थित होते.
(०३ मनमाड पाणी)
मनमाड शहरासाठीच्या करंजवण योजनेसंदर्भात ऑनलाइन बैठकीत आमदार सुहास कांदे.