प्रभाग ११ च्या समस्यांप्रश्नी मनपात बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 00:34 IST2020-01-15T22:28:36+5:302020-01-16T00:34:28+5:30
प्रभाग क्र. ११ मधील नागरी समस्या सोडविण्यासाठी नियोजन करण्यात येऊन येत्या पंधरा दिवसांत सर्व समस्या मार्गी लागतील. तसेच कामात कुचराई व हलगर्जीपणा करणाºया अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई करण्यात येईल, असे आदेश मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांनी दिले आहेत.

प्रभाग क्र. ११ मधील नागरी समस्यांबाबत मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांना जाब विचारताना सामाजिक कार्यकर्ते विनोद वाघ. समवेत नगरसेवक मदन गायकवाड, राजेंद्र शेलार, भरत बागुल आदी.
मालेगाव : प्रभाग क्र. ११ मधील नागरी समस्या सोडविण्यासाठी नियोजन करण्यात येऊन येत्या पंधरा दिवसांत सर्व समस्या मार्गी लागतील. तसेच कामात कुचराई व हलगर्जीपणा करणाºया अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई करण्यात येईल, असे आदेश मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांनी दिले आहेत.
प्रभाग क्र. ११ मध्ये येणाºया कलेक्टरपट्टा भागात नागरी सुविधांपासून नागरिक वंचित असल्याची तक्रार नगरसेवक कल्पना वाघ व युवा सेनेचे नेते विनोद वाघ यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली होती. कृषिमंत्री भुसे यांनी मनपा आयुक्त बोर्डे यांना तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. तसेच प्रभागातील नगरसेवक मदन गायकवाड, भरत बागुल, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र शेलार यांनी स्वखर्चातून रस्त्यांवरील खड्ड्यांवर मुरूम टाकून खड्डे बुजविले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी मनपा आयुक्तांच्या दालनात प्रभागाच्या विभागप्रमुखांची व लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीत नगरसेवक कल्पना वाघ, मदन गायकवाड, भरत बागूल, सुवर्णा शेलार, राजेंद्र शेलार आदंींनी अधिकाºयांना धारेवर धरले. प्रभागात अस्वच्छता आहे, डास प्रतिबंधक औषधांची फवारणी केली जात नाही, घंटागाडी वेळेवर येत नाही, ठिकठिकाणी जलवाहिन्या फुटल्या आहेत, रस्त्यांवरील खड्डे बुजविली जात नाहीत, पथदीप बंद आहेत यासह विविध तक्रारी करत अधिकाºयांना जाब विचारला. यावर आयुक्तांनी याबाबत योग्य नियोजन करून समस्या सोडविल्या जातील, असे आश्वासन दिले. बैठकीला उपायुक्त नितीन कापडणीस, शहर अभियंता कैलास बच्छाव, सहायक आयुक्त अनिल पारखे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन माळवाळ, विद्युत निरीक्षक अभिजित पवार, प्रभाग अधिकारी सुनील खडके, उपअभियंता जयपाल त्रिभुवन आदी उपस्थित होते.