दिंडोरी शहर सायबर कॅफेचालकांसाठी आज बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 22:54 IST2021-12-01T22:54:42+5:302021-12-01T22:54:42+5:30
दिंडोरी : सार्वत्रिक निवडणूक २०२१ ऑनलाईन नामनिर्देशनपत्र भरणे व आदर्श आचार संहितेचे पालन करण्यासाठी दिंडोरी शहरातील सायबर कॅफे चालक यांची गुरुवारी (दि.२) दुपारी १ वाजता आदिवासी सांस्कृतिक भवन येथे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे.

दिंडोरी शहर सायबर कॅफेचालकांसाठी आज बैठक
ठळक मुद्देसायबर कॅफे चालकांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन
दिंडोरी : सार्वत्रिक निवडणूक २०२१ ऑनलाईन नामनिर्देशनपत्र भरणे व आदर्श आचार संहितेचे पालन करण्यासाठी दिंडोरी शहरातील सायबर कॅफे चालक यांची गुरुवारी (दि.२) दुपारी १ वाजता आदिवासी सांस्कृतिक भवन येथे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे.
दिडोरी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकी कामी आदर्श आचारसंहितेचे पालन करणेसाठी नामनिर्देशन पत्रे विहीत मुदतीत ऑनलाईन भरण्याची माहिती देण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीसाठी दिंडोरी शहरातील सायबर कॅफे चालकांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी नागेश येवले यांनी केले आहे.