मालेगाव तालुका भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 07:00 PM2018-08-04T19:00:19+5:302018-08-04T19:00:55+5:30

मालेगाव : राज्यभरात पक्ष संघटन मजबूत करण्यात भर देण्यात येत आहे. याकरिता प्रत्येक कार्यकर्त्याने ‘नमो अ‍ॅप’ डाउनलोड करणे अत्यावश्यक आहे. बूथनिहाय पक्ष मजबूत करण्यासाठी २३ कामे निश्चित करण्यात आली आहेत. विरोधातील कार्यकर्त्यांनादेखील पक्षाशी जोडण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, तर सामान्य जनतेला आपल्या शासनाने केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी कार्यकर्त्यांनीच प्रचार मोहीम हाती घ्यावी, असे आवाहन भाजपाचे धुळे लोकसभा पक्ष विस्तारक डॉ. शशिकांत वाणी यांनी केले.

 Meeting of BJP office bearers of Malegaon taluka | मालेगाव तालुका भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक

मालेगाव तालुका भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक

Next
ठळक मुद्देशशिकांत वाणी : शासनाच्या कामांची व योजनांची सर्वसामान्य जनतेला माहिती द्या

मालेगाव : राज्यभरात पक्ष संघटन मजबूत करण्यात भर देण्यात येत आहे. याकरिता प्रत्येक कार्यकर्त्याने ‘नमो अ‍ॅप’ डाउनलोड करणे अत्यावश्यक आहे. बूथनिहाय पक्ष मजबूत करण्यासाठी २३ कामे निश्चित करण्यात आली आहेत. विरोधातील कार्यकर्त्यांनादेखील पक्षाशी जोडण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, तर सामान्य जनतेला आपल्या शासनाने केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी कार्यकर्त्यांनीच प्रचार मोहीम हाती घ्यावी, असे आवाहन भाजपाचे धुळे लोकसभा पक्ष विस्तारक डॉ. शशिकांत वाणी यांनी केले.
भाजपाच्या मालेगाव तालुका कार्यालयात तालुक्यातील मंडल अध्यक्ष, बूथप्रमुख व पदाधिकाºयांची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष दादा जाधव होते. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष दीपक पवार होते. याप्रसंगी डॉ. वाणी यांनी भाजपा बूथपातळीवर राबवावयाच्या अजेंड्यावर चर्चा करून मार्गदर्शन केले.
वाणी म्हणाले, गेल्या वर्षी पंडित दीनदयाल जन्मशताब्दीनिमित्ताने झालेल्या कार्यविस्तार योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. यात २५४ विस्तारकांनी काम केले. यावर्षी २९४ नवीन विस्तारक सहभागी झाले आहेत. त्यामुळे बूथरचना व शक्ती केंद्ररचना हे कार्य अधिक प्रभावी करण्याची जबाबदारी आहे. कार्यकर्ते तसेच पक्ष समर्थक व सामान्य मतदारांना नमो अ‍ॅप डाउनलोड करण्यास प्रोत्साहित करावे. मंडल स्थावर मोर्चा, आघाडी पदाधिकाºयांवर प्रत्येकी पाच-पाच बूथची जबाबदारी सोपवा, सर्व बूथची वर्गवारी करा, मतदान केंद्रानुसार बैठका घ्या, ‘मन की बात’ जास्तीत जास्त लोकांना ऐकता यावी यासाठी व्यवस्था करा, खासगी, सहकारी संस्था, एनजीओ यांच्या व पदाधिकाºयांच्या संपर्कात राहा, शासन योजनांच्या लाभार्थींची यादी तयार करा, शासनाच्या योजनांचा प्रचार करा अशा सूचना डॉ. वाणी यांनी केल्या. जिल्हाध्यक्ष जाधव व तालुकाध्यक्ष पवार यांनी मार्गदर्शन केले. कमलेश निकम यांनी प्रास्ताविक केले. तालुका सरचिटणीस दीपक देसले यांनी आभार मानले. बैठकीला सुनील पाटील, सुनील शेलार, गणेश निकम, अरुण पाटील, कैलास शर्मा, अनिल निकम, राहुल बोरसे, नाना पवार, हर्षल शेवाळे, काकाजी पवार, हिंमत देवरे, राहुल पगार, निखिल अहिरे, भाऊसाहेब दासनूर आदि उपस्थित होते.

Web Title:  Meeting of BJP office bearers of Malegaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.