वैद्यकीय प्रतिनिधींचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 00:54 IST2018-06-08T00:54:43+5:302018-06-08T00:54:43+5:30

सातपूर : किमान वेतन कायदा, कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी यांसह विविध मागण्यांसाठी एमएसएमआर संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि.७) राज्यस्तरीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला. सकाळी जिल्ह्यातील वैद्यकीय प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन दिले.

Medical Representative Front | वैद्यकीय प्रतिनिधींचा मोर्चा

वैद्यकीय प्रतिनिधींचा मोर्चा

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालय : विविध मागण्यांसाठी लाक्षणिक संप

सातपूर : किमान वेतन कायदा, कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी यांसह विविध मागण्यांसाठी एमएसएमआर संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि.७) राज्यस्तरीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला. सकाळी जिल्ह्यातील वैद्यकीय प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन दिले.
वैद्यकीय प्रतिनिधींसाठी असलेल्या कामगार कायद्याच्या अंमलबजावणीस राज्य व केंद्र सरकार टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत संघटनेच्या वतीने दि.१३ डिसेंबर २०१७ रोजी संप करून मागण्यांचे निवेदन कामगार मंत्र्यांना दिले होते. त्यांनी या मागण्यांबाबत लवकर निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते.
या मोर्चात जिल्ह्यातील ८०० वैद्यकीय प्रतिनिधी सहभागी झाले होते. या मोर्चात संघटनेचे शाखा सचिव रूपेश बिºहाडे, विभागीय सचिव पीयूष नांदेडकर, राज्य कमिटी सदस्य गणेश खैरनार, हर्षल नाईक, अमोल पाटील, नितीन साळुंके, रवि गोडसे, भावना चव्हाण, लीना रानडे, रंजना कुलकर्णी, ज्योती कोलते, रवि शिंदे, योगेश खर्डे, विकास भिंगारदिवे, कुलदीप रावत, विशाल खिंवसरा आदींसह वैद्यकीय प्रतिनिधी सहभागी झाले होते.मागण्यांचे निवेदन सादर अद्याप याबाबत कुठलाही निर्णय न झाल्याने सरकारच्या कामगारविरोधी आणि मालकधार्जिण्या धोरणाच्या विरोधात एमएसएमआर संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला. गुरु वारी सकाळी साडेदहा वाजता एम. आर. रेस्टहाउस ते गोळे कॉलनी असा मोर्चा काढून निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Web Title: Medical Representative Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.