गुरु जींचा रु पया हरवला, तो बँकेला सापडला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 05:54 PM2018-09-16T17:54:48+5:302018-09-16T17:55:33+5:30

‘गुरु जी, तुमच्या खिचडीच्या खात्यात एक रु पया जमा झाला काय? तेवढे बघा अन् लागलीच कळवा...’ असा संदेश मुख्याध्यापकांच्या भ्रमणध्वनीवर आला आणि जो तो आपल्या खात्यातील माहिती घेण्यासाठी बॅँकेत धाव घेऊन खातरजमा करताना दिसून आला. या एक रुपयाच्या संदेशामुळे बागलाण तालुक्यातील गुरुजींची दमछाक तर झालीच शिवाय नागरिकांची चांगलीच करमणूक झाली.

 Master Zinta lost rupee, bank found ... | गुरु जींचा रु पया हरवला, तो बँकेला सापडला...

गुरु जींचा रु पया हरवला, तो बँकेला सापडला...

googlenewsNext

त्याचे झाले असे की, माध्यमिक प्राथमिक ,अंगणवाडी अशा शासनस्तरावरील विविध शैक्षणिक शाखांतून पोषणआहार दिला जातो. यासाठी शासन अनुदानही देते. हे अनुदान तालुक्याच्या पंचायत समितीकडून दिले जायचे. मात्र हा निधी प्राप्त व्हायला बराचसा कालावधी जायचा. अनेक समस्या निर्माण व्हायच्या. त्यामुळे ही योजना व गुरु जी अडचणीत यायचे. या अडचणी येऊ नयेत म्हणून सदर निधी वेळेत पोहोचावा यासाठी आता थेट केंन्द्रस्तरावरु न मुख्याध्यापक बँक खात्यावर वर्ग होणार आहे. मग पूर्वीचे हे बॅँक खाते बरोबर आहे काय? यासाठी खात्री व्हावी म्हणून केंद्रियस्तरावरु न एक रु पया या खात्यावर टाकून अधिकारीवर्ग हे खाते सुरु  आहे की नाही याची  प्रायोगिक तत्वावर खात्री करीत आहेत. यासाठी प्रत्येक मुख्याध्यापकांच्या खात्यावर एक रु पया टाकलेला आहे. खात्यावर एक रु पया आला का त्याच्या शोधार्थ जिल्हाभरातील गुरु जी धावपळीत दिसत आहेत. यासाठी खेड्यापाड्यावरील गुरुजी महागाईत भाववाढ झालेले पेट्रोल जाळून विद्यार्थांचा अभ्यास बुडवून ‘एक रु पया’ शोधायला. गुरु जी बँकेत पोचले तर तिथे गुरु जीच गुरु जी, जो तो एकमेकाला ‘तुमचा एक रु पया सापडला काय?’ अशी विचारणा करताना दिसत आहेत. ज्याचा एक रु पया सापडला तो विजयी मुद्रेत इतरांना ‘माझा एक रु पया सापडला. माझे खाते बरोबर आहे’ असे सांगत असून ज्याचा सापडला नाही तो मात्र एक रु पया हरवल्याच्या विवंचनेत दिसत होता. एक रु पया शोधण्यास गेलेल्या गुरुजींना पाहून मुले खेळताना म्हणत होते...
गुरु जींचा रु पया हरवला, तो बँकेला सापडला...

Web Title:  Master Zinta lost rupee, bank found ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.