कोरोनाशी लढणाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर किट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 11:02 PM2020-04-15T23:02:53+5:302020-04-15T23:03:29+5:30

कोरोनाशी लढणाऱ्यांना तालुका कॉँग्रेस व गुरुदत्त शिक्षण संस्थेकडून मास्क, सॅनिटायझरच्या ८०० किटचे वाटप करण्यात आले.

Masks, sanitizer kits for those who fight Corona | कोरोनाशी लढणाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर किट

कळवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्याकडे कोरोना संरक्षण किट सुपुर्द करताना शैलेश पवार, सुमित्रा बहिरम, रोहिणी महाले, सुनील बस्ते, प्रवीण कासार, अभिजित पवार आदी.

Next

कळवण : कोरोनाशी लढणाऱ्यांना तालुका कॉँग्रेस व गुरुदत्त शिक्षण संस्थेकडून मास्क, सॅनिटायझरच्या ८०० किटचे वाटप करण्यात आले.
गुरुदत्त शिक्षण संस्था, मानूर, कळवण तालुका काँग्रेस कमिटी, शैलेश पवार मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने शहर व तालुक्यातील महसूल यंत्रणा, कळवण व अभोणा पोलीस स्टेशन, तालुका आरोग्य अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्र, नगरपंचायत, उपजिल्हा रुग्णालय, पंचायत समितीचे प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा सेविका, पत्रकार, होमगार्ड आदींना कोरोनापासून बचावासाठी सॅनिटायझर, मास्क, हॅण्डग्लोज, व्हिटामिन सी टॅब आदी साहित्याचे सेफ्टी किट वाटप करण्यात आले.
शहर व तालुक्यात लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा सतर्कतेने तालुक्यात लक्ष ठेवून परिसर पिंजून काढत आहे. प्रशासकीय यंत्रणेने वेगवेगळ्या पथकांची निर्मिती करून कळवण शहरात घरोघरी सर्वेक्षण करून बाहेरून कोणी आले आहे का? याची शहानिशा करून कर्मचाºयांमार्फत पाळत ठेवल्यामुळे कळवण शहरात प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
यावेळी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस सुमित्रा बहिरम, युवक कॉँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष शैलेश पवार, नगराध्यक्ष रोहिणी महाले, उपनगराध्यक्ष अतुल पगार, तहसीलदार बी. ए. कापसे, गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, भाऊसाहेब पगार, अभिजित पवार, गौरव जैन, सुनील बस्ते, प्रवीण कासार आदी उपस्थित होते.

सोळा दिव्यांग कुटुंबांना किराणा
येवला : येथील अंकिता अजय सोमाणी यांनी वाढदिवसानिमित्त शहर परिसरातील सोळा गरजू दिव्यांग कुटुंबांना किराणा वाटप केला आहे. शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, येवला पंचायत समिती गटविकास अधिकारी देशमुख यांच्या उपस्थित किराणा वाटप केला. याप्रसंगी गोपाल काबरा, माजी नगरसेवक नितीन काबरा, संदीप मोरे उपस्थित होते.

Web Title: Masks, sanitizer kits for those who fight Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.