मास्क आहे जरूरी....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 00:51 IST2021-02-23T21:53:23+5:302021-02-24T00:51:00+5:30
सध्या कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. खरेतर दुसरी फेज सुरू होण्याची वाट न बघता सर्वांनी पूर्वीसारखीच काळजी घेणे अनिवार्य आहे.

सचिन पाटील, पोलीस अधीक्षक,नाशिक ग्रामीण.
सध्या कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. खरेतर दुसरी फेज सुरू होण्याची वाट न बघता सर्वांनी पूर्वीसारखीच काळजी घेणे अनिवार्य आहे. लॉकडाऊनच्या काळात नियमांची कडक अंमलबजावणी असताना रुग्णसंख्या वाढत होती. आता शासनाने इतकी शिथिलता देऊनदेखील अनेक ठिकाणी रुग्ण पुन्हा वाढू लागले आहे. सर्वांनी एसएमएस प्रणालीचा वापर करावा म्हणजे फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझर हे कायमचे सोबती ठेवल्यास आपण कोविडला लांब ठेऊ शकतो. बाजारात जाताना सगळ्या परिवाराने न जाता एकानेच जावे. मास्क हे निरोगी जीवन जगण्याची ढाल बनली आहे. सार्वजनिक ठिकाणी जातानादेखील खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. व्यक्तिगत पातळीवर स्वतःहून संचारबंदी केल्यास पोलिसांनादेखील कार्यवाही करण्यास भाग पडणार नाही. मास्क आहे जरूरी नका समजू मजबुरी हे मात्र विसरू नये.
- सचिन पाटील, पोलीस अधीक्षक,नाशिक ग्रामीण.