पाटोदा येथे शेतमजुरांना मास्कचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 17:49 IST2020-04-05T17:48:29+5:302020-04-05T17:49:05+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील शिवजयंती उत्सव समिती पदाधिकाऱ्यांनी गाव-मळ्यात जाऊन कष्टकरी, शेतकरी-शेतमजूरांना मास्कचे मोफत वितरण केले.

पाटोदा येथे शेतमजुरांना मास्कचे वाटप
पाटोदा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील शिवजयंती उत्सव समिती पदाधिकाऱ्यांनी गाव-मळ्यात जाऊन कष्टकरी, शेतकरी-शेतमजूरांना मास्कचे मोफत वितरण केले. शिवजयंती उत्सव समिती प्रमुख जगदीश बोराडे आणि सहकारी सागर बैरागी, श्रीनिवास बोनाटे, गणेश बोराडे, प्रताप पाचपुते, गणेश बैरागी, ऋषी जाधव, पप्पू शेटे, महेश शेटे, सुनील बोराडे, गणेश पिंपरकर, योगेश जाधव, लहू पवार, अंगुर मुलानी, सुनील पाचपुते, सचिन म्हस्के, गोकुळ राजगुरू, लखन पगारे, पापा चौधरी, संजय जाधव आदींनी गाव परिसरातील ८०० कष्टकरी, गोरगरीबांना घरोघरी व मळ्यात जावून मास्क वाटप केले. सामाजिक जाणीवेतून हा उपक्र म राबविण्यात आला आहे.