मधुबन कॉलनीत विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:32 IST2019-07-14T00:27:56+5:302019-07-14T00:32:29+5:30
मखमलाबाद रोडवरील मधुबन कॉलनीत राहणाऱ्या एका १९ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

मधुबन कॉलनीत विवाहितेची आत्महत्या
पंचवटी : मखमलाबाद रोडवरील मधुबन कॉलनीत राहणाऱ्या एका १९ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गीता अनिल पंडित (१९) असे आत्महत्या करणाºया विवाहितेचे नाव आहे. दुपारी गीता पंडित यांनी मखमलबाद रोडवरील मधुबन कॉलनीतील सोहम अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये छताच्या पंख्याला दोरी लावून गळफास घेतला. सदर घटना कुटुंबातील सदस्यांच्या लक्षात येताच गीता यांना तत्काळ जिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. गीता यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही.