नाशिक : आडगाव शिवारातील पगारमळा भागात राहणाऱ्या शिल्पा पंकज आहेर (२७, रा. टी विंग पार्क साईड होम्स, पगारमळा) या विवाहितेने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शिल्पा आहेर यांनी गुरुवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास राहत्या घरात पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी भाग्यश्री सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीवरून आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विवाहित महिलेची आडगावी आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 01:20 IST