विवाहिता आत्महत्या; मावसभावावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:48 IST2018-07-25T00:48:03+5:302018-07-25T00:48:19+5:30

तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या मावस बहिणीस लग्नापूर्वीच्या प्रेम संबंधाविषयी सासरच्या लोकांना सांगेन असा दम देत विवाहीत मावस बहिणीस आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Marriage Suicide; Filed under the FIR | विवाहिता आत्महत्या; मावसभावावर गुन्हा दाखल

विवाहिता आत्महत्या; मावसभावावर गुन्हा दाखल

नाशिक : तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या मावस बहिणीस लग्नापूर्वीच्या प्रेम संबंधाविषयी सासरच्या लोकांना सांगेन असा दम देत विवाहीत मावस बहिणीस आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दिंडोरी गांधीनगर निळवंडीरोड येथील मोहिनी अशोक गायकवाड हीचा तीन महिन्यापूर्वी नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे गाव खंडेराव नगर इंदिरा आवास योजना घरकुलात राहाणाऱ्या उजेश गवारे याच्याशी विवाह झाला होता. मात्र मोहिनी हीचे लग्नापूर्वी तिचा मावसभाऊ महेश नाना पांडव रा.अकाळे ता. दिंडोरी याच्याशी कथित प्रेमसंबंध होते. मोहिनीच्या लग्नानंतर तिचा मावसभाऊ महेश हा सतत मोहिनीला फोनवर बोलुन व व्हॉटस्अपवर मेसेज पाठवुन संबंध ठेवण्याबाबत धमकी देत होता. मोहिनी लग्नानंतर घरी आली असता तिने आईला महेश हा वारंवार फोन करून त्रास व धमकी देत असल्याचे सांगितले. सोमवारी दुपारी मोहिनीचे महेश याच्याशी बोलणे झाल्यानंतर तो शिंदे गाव येथे तिच्या सासरी आला होता. मात्र सायंकाळी पाचच्या  पूर्वी मोहिनी हीने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. महेश यानेच मोहिनीच्या घरी फोन करून आत्महत्येची माहिती दिली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मोहिनीचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये तिचे शेवटचे बोलणे महेशशी झाल्याचे निष्पन्न झाले. मोहिनी हीची आई सुशीला अशोक गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित महेश नाना पांडव याला पोलिसांनी जाब विचारत ताब्यात घेतले.

Web Title: Marriage Suicide; Filed under the FIR