विवाहितेची छेड; विनयभंगाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 19:03 IST2018-10-14T19:01:41+5:302018-10-14T19:03:15+5:30
भररस्त्यात लासलगाव येथील कोटमगाव रस्त्यावर एका विवाहितेची छेड काढून तिच्याशी अश्लील वर्तन केल्यासंदर्भात लासलगाव येथील काँग्रेस पदाधिकारी महेश बाफना याच्या विरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाहितेची छेड; विनयभंगाचा गुन्हा दाखल
लासलगाव : भररस्त्यात लासलगाव येथील कोटमगाव रस्त्यावर एका विवाहितेची छेड काढून तिच्याशी अश्लील वर्तन केल्यासंदर्भात लासलगाव येथील काँग्रेस पदाधिकारी महेश बाफना याच्या विरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लासलगाव पोलिसांनी यासंदर्भात दिलेली माहिती अशी की, पिंपळगाव नजीक येथे राहणारे फिर्यादी व त्यांची पत्नी रस्त्याने जात असताना काँग्रेस पदाधिकारी असलेले महेश बाफना यांनी त्यांच्या पत्नीशी असभ्य व गैरवर्तन करून सदर महिलेला लज्जा निर्माण होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद लासलगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. या तक्र ारीवरून संशयित महेश बाफना याच्यावर लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, संशयित महेश बाफना यास अद्यापपर्यंत अटक करण्यात आलेली नाही. लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक निवारण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करीत आहेत.