विवाहाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:31 IST2018-11-25T23:50:52+5:302018-11-26T00:31:36+5:30
विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा प्रकार दिंडोरीरोड परिसरात घडला आहे़ या प्रकरणी संशयित मुकेश दादाभाऊ बकुरे (२४, रा. शेषराव महाराज मंदिराजवळ, देवीगल्ली, फुलेनगर, पंचवटी) याच्या विरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

विवाहाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार
नाशिक : विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा प्रकार दिंडोरीरोड परिसरात घडला आहे़ या प्रकरणी संशयित मुकेश दादाभाऊ बकुरे (२४, रा. शेषराव महाराज मंदिराजवळ, देवीगल्ली, फुलेनगर, पंचवटी) याच्या विरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ म्हसरूळ पोलीस ठाण्यात पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित बकुरे हा गुरुवारी (दि़२२) तिच्या घरी आला व शरीरसंबंधाची मागणी केली़ तरुणीने विवाह झाल्याशिवाय शरीरसंबंध नाही असे सांगितले असता संशयिताने बळजबरीने अत्याचार केला़ यानंतर पीडित तरुणीने विवाहाबाबत विचारणा केली असता तिला मारहाण करून तिच्याकडीने सोन्याचे दागिने घेऊन निघून गेला़ दरम्यान, संशयित बकुरे हा फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत़
विवाहाचे आमिष दाखवून शाळकरी मुलीवर बलात्कार
नाशिकरोड : पंधरा वर्षीय शाळकरी मुलीसोबत प्रेमसंबंध निर्माण करून तिला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना नाशिकरोड परिसरात घडली आहे़ याप्रकरणी संशयित सचिन बाबूराव पगारे (२२, देवळालीगाव, नाशिकरोड) विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
शाळकरी मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार वर्षभरापूर्वी तिची ओळख सचिन पगारेसोबत झाली होती़ यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले व ते एकमेकांना लपूनछपून भेटत असत़ चार महिन्यांपूर्वी पीडित मुलीची शाळा सुटल्यानंतर पगारे याने तिला दुचाकीवरून बसवून आनंदनगर परिसरातील मोकळ्या मैदानात नेऊन बळजबरीने तिच्यासोबत शारीरिक संबंध केले व त्यानंतरही दोन-तीन वेळा असाच प्रकार झाला़ दरम्यान, संबंधित मुलगी यामुळे गर्भवती असल्याचे डॉक्टरांच्या तपासणीत आढळून आले़ यानंतर पीडित मुलीने आईसह उपनगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली़ त्यानुसार उपनगर पोलिसांनी बलात्कार तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़