प्रेमसंबंध निर्माण करून विवाहितेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:18 IST2018-09-27T00:17:53+5:302018-09-27T00:18:09+5:30

विवाहितेसोबत प्रेमसंबंध निर्माण करून तिला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना राजीवनगर परिसरात घडली आहे़ या प्रकरणी संशयित प्रकाश श्रावण लोखंडे (३२, रा़ राजीवनगर, झोपडपट्टी) विरोधात इंदिरानगर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे़

 Marriage atrocities by creating a love affair | प्रेमसंबंध निर्माण करून विवाहितेवर अत्याचार

प्रेमसंबंध निर्माण करून विवाहितेवर अत्याचार

इंदिरानगर : विवाहितेसोबत प्रेमसंबंध निर्माण करून तिला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना राजीवनगर परिसरात घडली आहे़ या प्रकरणी संशयित प्रकाश श्रावण लोखंडे (३२, रा़ राजीवनगर, झोपडपट्टी) विरोधात इंदिरानगर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे़  विवाहिता व संशयित यांचे विवाहापूर्वी एकमेकांमध्ये प्रेमसंबंध होते़ मात्र, काही कारणांमुळे विवाह होऊ शकले नाहीत़ विवाहिता व संशयित लोखंडे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी विवाह करून संसार सुरू होता़ पीडित विवाहिता ही पती व दोन मुलांसह २००८ मध्ये राजीवनगर परिसरात वास्तव्यास आली़ १७ ते ३० जून या कालावधीत संशयित लोखंडे याने विवाहितेचा संसार उद्ध्वस्त व्हावा यासाठी तिचा पती घरात असताना त्यास आमचे दोघांचे पूर्वीपासून प्रेमसंबंध असल्याचे सांगितले़ यामुळे विवाहितेचा पती तिला व मुलांना सोडून निघून गेला़  यानंतर संशयित लोखंडे याने पीडित विवाहितेस तिच्या मुलांकडे आईकडे पाठविण्यास सांगून तिच्यासोबत विवाह करण्याचे  आमिष दाखवून सोबत घेऊन गेला़

Web Title:  Marriage atrocities by creating a love affair