शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

लग्न मांडवातच अवयवदानाचा संकल्प सोडला अन् रक्तदानही केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 8:44 PM

वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने यावेळी अवयवदानाचे अर्ज भरून घेण्यात आले तसेच रक्तसंकलनही करण्यात आले.

ठळक मुद्देरक्तदानाने सहजीवनाला प्रारंभसर्वप्रकारच्या कर्मकांडांना फाटा दिला.

नाशिक : वधू-वर शासकीय अधिकारी... मग ते लग्नही तसेच धडाकेबाज, अशी कल्पना केली जाणे स्वाभाविक आहे. शहरातही असेच एक जोडपे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विवाहबंधनात अडकले; मात्र त्यांचा विवाह हा आगळावेगळा सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारा ठरला. वधू-वरासह व-हाडी मंडळींनी लग्न मांडवातच अवयवदानाचा संकल्प सोडला अन् रक्तदान करत लग्नाचा आहेर दिला.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अभिनव विवाहाच्या निमंत्रणाची चित्रफित चांगलीच गाजली. या चित्रफितीतून भविष्यनिर्वाहनिधी विभागाचे सहायक आयुक्त वधू वर्षा पगार, तर आयकर विभागाचे सहायक आयुक्त वर स्वप्नील कोठावदे यांनी पर्यावरण, रक्तदान, अवयवदानाची शपथ घेऊया...अन् हाच असेल आमच्या लग्नाचा आहेर, असे आगळे आमंत्रणच दिले होते. या दोघा अधिकाऱ्यांचा विवाह मोठ्या उत्साहात रविवारी (दि.१८) बोधलेनगर परिसरातील एका लॉन्समध्ये पार पडला.दरम्यान, गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हे जोडपे विवाहबद्ध झाले. नव वधू-वर यांनीही अवयवदानाचा अर्ज भरत रक्तदान के ले. तसेच विवाहासाठी जमलेल्या व-हाडींपैकी अनेकांनी अवयवदानाचा संकल्प सोडत अर्जही भरले. यावेळी बहुतांश पाहुण्यांनी विवाह मांडवातच रक्तदान करत वधू-वरांच्या सामाजिक बांधिलकीच्या हाकेला प्रतिसाद दिला. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने यावेळी अवयवदानाचे अर्ज भरून घेण्यात आले तसेच रक्तसंकलनही करण्यात आले.रक्तदानाने सहजीवनाला प्रारंभविवाहचे मंगलाष्टकपूर्वी रक्तदान करून या अधिकारी जोडप्यांनी सहजीवनाची आगळीवेगळी सुरुवात केली. सामाजिक बांधिलकीची जोपासना करण्याचा प्रयत्न या विवाहाच्या माध्यमातून करण्याचा हा पायंडा त्यांनी एकप्रकारे समाजापुढे ठेवत ‘आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं काही देणं लागतो’ ही आठवण करून दिली. एवढेच नव्हे तर जोडीदार निवडीप्रसंगी कुठल्याही अंधश्रद्धेचा बळी न ठरता सत्यशोधक पद्धतीने एकमेकांचे जीवनसाथी बनण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सर्वप्रकारच्या कर्मकांडांना फाटा दिला.

टॅग्स :NashikनाशिकOrgan donationअवयव दान